संपूर्ण राज्यामध्ये जून ते सप्टेंबर 2022 या कालावधीदरम्यान जोरदार पाऊस झाल्यामुळे नाशिक जिल्ह्यासह काही जिल्ह्यांमध्ये मालमत्तेच्या नुकसानी करता मदत मिळावी यासाठी निधी वितरण शासन निर्णयान्वये करण्यात आले असून यामध्ये नाशिक जिल्ह्याला जून व जुलै 2022 या कालावधीत झालेल्या नुकसानीसाठी 25 लाख 49 हजार तर ऑगस्ट आणि सप्टेंबर 2022 मधील झालेल्या नुकसानीसाठी 23 लाख असा एकूण 48 लाख 49 हजार निधी जिल्ह्यासाठी वितरीत करण्यात आला आहे.
नक्की वाचा:राज्यात पावसाचा जोर ओसरला, आज 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
या कालावधीमध्ये जो काही पाऊस झाला यामुळे उद्भवलेल्या पूरपरिस्थिती मुळे नाशिकसह राज्यातील जिल्ह्यांमध्ये पिकांचे व मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पावसामुळे जी काही पूरपरिस्थिती उद्भवली यामध्ये मालमत्तेच्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानुसार निधी वितरीत करण्यात आला आहे.
एवढेच नाही तर जून ते ऑक्टोबर 2022 या कालावधीमध्ये जे काही नुकसानभरपाई झालेली आहे किंवा संभाव्य होणाऱ्या मालमत्तेचे नुकसान करिता शासन 11 ऑगस्ट 2021 अन्वये विहित करण्यात आलेल्या मदतीच्या वाढीव दराने मदत अनुज्ञेय करण्यात आल्याने वाढीव दर आणि मदत देणे आवश्यक आहे.
नक्की वाचा:बातमी कामाची! पीक नुकसानीचे 1106 कोटी आले; उद्यापासून बँक खात्यांत होणार जमा
या कालावधीमध्ये जे काही मालमत्तेचे नुकसान झाले होते या नुकसानीचे प्रस्ताव संबंधित विभागीय आयुक्तांकडून प्राप्त झालेल्या नुसार देण्यात आलेला निधीमध्ये वाढीव दराने व ऑगस्ट ते सप्टेंबर 2022 या कालावधीत जी काही मालमत्तेचे नुकसान झालेले आहे त्याकरिता मदत देण्यासाठी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
मदतीचे एकंदरीत स्वरूप
नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर जून व जुलै मध्ये झालेले नुकसान यासाठी 25 लाख 49 हजार आणि ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधीत झालेल्या नुकसानीसाठी 23 लाख असा एकूण 48 लाख 49 हजार निधी वितरित करण्यात आला असून यामधून ज्या घरांची पडझड झाली किंवा ज्या पात्र घरांमध्ये किंवा दुकानामध्ये सामानाची नासधूस झाली आहे, याचा समावेश आहे.
नक्की वाचा:हवामान विभागाची अधिकृत घोषणा, असा राहील पाऊस आणि या तारखेपासून मान्सून परतीच्या प्रवासाला
Published on: 22 September 2022, 10:43 IST