News

परतीचा मॉन्सून गेल्यानंतर राज्यातील वातावरणात झपाट्याने बदल होऊ लागले आहेत. मध्यरात्रीनंतर हवेत गारवा तयार होत आहे, त्यामुळे किमान तापमानात घट होत असून काही ठिकाणी धुके पडण्यास सुरुवात झाली आहे.

Updated on 31 October, 2020 10:54 AM IST


परतीचा मॉन्सून गेल्यानंतर राज्यातील वातावरणात झपाट्याने बदल होऊ लागले आहेत. मध्यरात्रीनंतर हवेत गारवा तयार होत आहे, त्यामुळे किमान तापमानात घट होत असून काही ठिकाणी धुके पडण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत कमाल जळगाव येथे कमाल ३५.३ अंश सेल्सिअस तर नाशिकमध्ये १५.० अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. हवेतील बाष्प कमी झाल्याने वातावरण कोरडे झाले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागात उन्हाचा चटका वाढला आहे.

पुणे, परभणी, अकोला, अमरावती, ब्रम्हपुरी, नागपूर, वर्धा, येथील कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंश सेल्सिअस वाढ झाली आहे. तर अनेक ठिकाणी कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. उत्तरेकडून येत असलेल्या वाऱ्यामुळे सायंकाळनंतर किमान तापमानाचा पारा कमी होत असला तरी जळगाव, सोलापूर, परणी संपूर्ण विदर्भात सरासरीच्या तुलनेत चार अंश घट झाली आहे. अमरावती येथे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उणे चार अंश सेल्सिअसने घट झाली आहे.

येथे १५.७ अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान नोंदविले गेले, तर परभणी येथे सरासरीच्या तुलनेत उणे दोन अंश सेल्सिअसने घट होऊन १६.६ अंश सेल्सिअस एवढे किमान तापमान होते. येत्या काही दिवस राज्यातील वातावरणात वेगाने बदल होणार असून कमाल किमान तापमानात घट होईल. त्यामुळे राज्यात हळूहळू गारठा सुटण्यास सुरुवात होईल. पुण्यातही किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते.

 

English Summary: state climate become cold
Published on: 31 October 2020, 10:54 IST