भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) सर्व शेतकऱ्यांसाठी एक नवीन सेवा सुरू केली आहे. या सुविधेद्वारे शेतकरी घरबसल्या आपली कामे करू शकतात. ग्रामीण भागात बँकिंग सिस्टिममधील अडथळे आणि शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी यावर मात करण्यासाठी ही सुविधा लाभदायक ठरणार आहे.
किसान क्रेडिट कार्डातील नव्या सुविधा
जे शेतकरी किसान क्रेडिट कार्डाचा वापर करतात, त्यांना क्रेडिट कार्डच्या रक्कम मर्यादेत घरबसल्या वाढ करून घेता येणार आहे. यापूर्वी शेतकऱ्यांना आपल्या गावातील बँकेच्या शाखेत यासाठी जावे लागत होते. रांगेत अनेक तासांच्या प्रतीक्षेनंतर त्यांना क्रेडिट कार्डच्या मर्यादेत वाढ करता येत होती. मात्र, आता भारतीय स्टेट बँकेने दिलेल्या सुविधेनुसार, योनो कृषी अॅपवर शेतकरी त्यांच्या किसान क्रेडिट कार्ड रिव्ह्यू सर्व्हिस वापरू शकतात. या फिचरद्वारे शेतकऱ्यांना क्रेडिट लिमिट वाढविण्यासाठी बँकेत जावे लागणार नाही. ते घरबसल्या या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.
yono योनो कृषी अॅपवरून किसान क्रेडिट कार्ड रिव्ह्यू करताना
एसबीआयने दिलेल्या माहितीनुसार, योनो अॅपवरून किसान क्रेडिट कार्ड रिव्ह्यू सर्व्हिस वापरणे हे खूप सोपे आहे. शेतकरी केवळ चार क्लिकद्वारे आपली क्रेडिट कार्डची मर्यादा वाढवून घेऊ शकतात. यासाठी कोणत्याही प्रकारचे पेपरवर्क करावे लागत नाही. एसबीआयचे चेअरमन रजनीश कुमार म्हणाले, योनो किसान क्रेडिट कार्ड रिव्ह्यूची प्रक्रिया ही अतिशय सोपी आहे. भारतीय स्टेट बँकेने शेतकऱ्यांना मदतीसाठी हा आणखी एक उपक्रम हाती घेतला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या गरजा भागविताना, भविष्यातील तंत्रज्ञानाच्या वापर करत, डिजिटल प्लॅटफॉर्मला जोडण्याचा हा इनिशिएटिव्ह आहे. शेतकऱ्यांची सुरक्षा आणि सुविधा या दोन्ही बाबी लक्षात घेऊन हा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला आहे.
Yono krishi App चे फायदे
- -शेतकरी किसान क्रेडिट कार्ड वापराबरोबरच, योनो अकाउंटही ओपन करू शकतात.
- योनो कृषी प्लॅटफॉर्मवर शेतकऱ्यांना बँकेचे अकाउंट ओपन करण्याचीही सुविधा मिळू शकते.
- शेतकऱ्यांच्या गुंतवणूक आणि विमाविषयक गरजांसाठीही आर्थिक गरजा भागविण्याचे कामही येथून होऊ शकेल.
- योनो मित्र या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून कृषी सल्लागार सेवाही शेतकऱ्यांना मिळू शकतात.
- योनो कृषी अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती मंडीशी जोडले जाईल. तेथे शेतकऱ्यांना खते, बियाणे विक्री, ऑनलाइन बाजार अशा सुविधाही मिळू शकतील.
- एसबीआयने भारतामध्ये दहा लँग्वेजमध्ये हे अॅप लाँच केले आहे.
- पेपरलेस केसीसी रिव्ह्यूच्या प्रक्रियेने शेतकऱ्यांना आपल्या क्रेडिट कार्डच्या मर्यादेत वाढ करण्याची प्रक्रिया अधिक वेगवान होऊ शकेल.
Published on: 16 September 2020, 06:32 IST