"माझा एक दिवस माझ्या बळीराजासाठी" या अतिशय अभिनव अभियाना अंतर्गत महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माननीय नामदार श्री अब्दुल सत्तार साहेब गुरुवार आणि शुक्रवार विदर्भाचे दौऱ्यावर येत आहेत.उपरोक्त अभियानांतर्गत अमरावती जिल्ह्यातील
धारणी तालुक्यातील सादरा वाडी येथील शेतकरी बांधवांचे शेतावर संपूर्ण दिवस प्रत्यक्ष उपस्थित राहत माननीय मंत्री महोदय त्यांच्या समस्या आणि दैनंदिनी समजून घेणार आहेत.Hon'ble Minister will understand their problems and daily life.गुरुवारी रात्री उशिरा ते अकोला येथील डॉ.
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे विश्रामगृहात मुक्कामी येणार आहेत.शुक्रवार दिनांक 2 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते 12 वाजे दरम्यान माननीय मंत्री महोदय महाबीज भवन येथे महाराष्ट्र बियाणे महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार
आहेत.त्यानंतर दुपारी 12:30 ते 2:30 वाजेदरम्यान नामदार अब्दुल सत्तार साहेब डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला भेट देणार असून माननीय कुलगुरू आणि इतर अधिकारी वर्गांसोबत आढावा बैठक घेणार आहेत.
Published on: 01 September 2022, 08:34 IST