News

आपला मसाल्याच्या पदार्थांसाठी हजारो वर्षांपासून प्रसिद्ध आहे. भारतात राहणाऱ्या लोकांच्या जेवनात असलेल्या भाजीला मसाल्याशिवाय चव येत नाही. जेवनाची शोभा वाढवणाऱ्या मसाला व्यवसाय आपल्या आयुष्यात शोभा वाढवू शकतो. ज्या युवकांना आपला व्यवसाय सुरु करायचा असेल तर आपण मसाला उद्योगाविषयी विचार केला पाहिजे.

Updated on 08 July, 2020 5:24 PM IST

 

आपला मसाल्याच्या पदार्थांसाठी हजारो वर्षांपासून प्रसिद्ध आहे. भारतात राहणाऱ्या लोकांच्या जेवनात असलेल्या भाजीला मसाल्याशिवाय चव येत नाही. जेवनाची शोभा वाढवणाऱ्या मसाला व्यवसाय आपल्या आयुष्यात शोभा वाढवू शकतो. ज्या युवकांना आपला व्यवसाय सुरु करायचा असेल तर आपण मसाला उद्योगाविषयी विचार केला पाहिजे. सर्व हंगामात चालणारा हा व्यवसाय असून यातून मिळणारे उत्पन्न हे निश्चीत असते. फक्त याची मार्केटिंग व्यवस्थित केली गेली पाहिजे.  जर आपण शेतकरी आहात आणि मिरची, लसूण याचे उत्पन्न घेत असाल तर लागणाऱ्या कच्चा मालावर आपला अधिकचा खर्च होणार नाही. यामुळे आपोआप आपला नफा जास्त होईल.

आज आपण याच उद्योगाविषयी जाणून घेणार आहोत. व्यवसाय सुरू करण्यापुर्वी आधीचा बाजाराची माहिती, त्याचा अभ्यसाास केला पाहिजे. बाजारात मसाले विकायचे कसे आहेत, किती प्रतिस्पर्धी आहेत याचा अभ्यास व्यवसाय सुरु करण्यापुर्वी करावा. बाजारात अनेक मोठं - मोठे ब्रँड आहेत, पण आपण व्यवसाय सुरुवातील छोट्या स्वरुपात सुरू करणारआहोत, तर मोठ्या ब्रँडबरोबर आपण स्पर्धा करायची नाही. ज्या भागात मोठे ब्रँड पोहचले नसतील तेथील मार्केट आपण काबीज करायचे. व्यवसाय सुरु करताना खूप मोठा खर्च करु नका. मसाले आपण सुरुवातीला साध्या पाकिटातून विकण्यास सुरुवात करा. व्यवसाय सुरु केल्यानंतर लगेच नफा- तोटाविषयी विचार करू नका.  बऱ्याचवेळा आपण व्यवसाय सुरु करतो आणि लगेच नफ्याची अपेक्षा करत असतो.  आपण विकलेला मालाविषयी रिस्पॉन्स तपासत राहा, फि़डबॉक घेत राहा. एकादा आपण यात रुळलो तर एखादा मोठा प्लांट टाकू शकतो. प्लांटसाठी आपल्याला लागेल ते म्हणजे जागा, मशिनरी, कामगार आणि मार्केट म्हणजे बाजारपेठ.

छोट्या स्वरुपात व्यवसाय सुरू करताना कोणत्या गोष्टी ठेवाल लक्षात 

  • मशीन्स घेताना महागातील मशीन घेऊ नका, ग्राइंडिग मिक्सिंग आणि पॅकिगच्या मशिन्स या स्वस्तातील घ्या. जर सेकंड हँण्ड मिळाल्या तर त्या घ्या जेणेकरून आपला खर्च कमी होईल.
  • ब्रँडचे नाव ठरवा, फूड लायन्ससाठी अर्ज करुन ठेवा. पॅकिगसाठी स्वस्तातील स्वस्त पर्याय वापरा.
  • उत्पादन चालू करताना आपल्याला कच्चा माल हवा असतो. मसाल्याचा उद्योग करायचा म्हणजे कच्चा माल हा आपल्याला शेतातून मिळू शकतो. नाहीतर आपण होलसेल दुकानदाराकडून याची खरेदी करु शकतो. जर एकदा आपला या व्यवसायात जम बसला तर आपण कच्चा माल केरळमधून मागवू शकतो.
  • उत्पादन चालू करताना आपल्या मालावर उत्पादित मालावर लक्ष ठेवले पाहिजे. सर्व कामगार एकच प्रकारची सामुग्री वापरत आहेत ना. किंवा एकच कृती करत आहेत ना यावर लक्ष ठेवा. जर एखादा पदार्थ कमी जास्त झाला तर चव बदलत असते.
  • आपल्या मसाल्याची चव, शुद्धता आणि गुणवत्ता एक सारखीच राहिली पाहिजे, तरच आपल्याला ग्राहक मिळेतील.
  • जागेची स्वच्छता ठेवा, मसाल्यांना मानवी स्पर्श होणार नाही, यासाठी प्रयत्न करा, उदा. कामगाराच्या हातात पंजे असावेत. अन्न व औषध प्रशासनाच्या नियमांचे काटेकोर पालन झालेच पाहिजे व त्याकडे डोळ्यात घालून लक्ष द्या.
  • तयार झालेला माल आणि शिल्लक राहिलेला माल कसा साठवून ठेवावा हे माहित करुन घ्या. जेणेकरून त्यात किडे वगैरे होणार नाहीत. 

व्यवसाय करताना मार्केटिंग खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे उत्पादनाबरोबर मार्किटवर लक्ष द्यावे. दुकानदारांना आपलामाल देताना दुसऱ्या मालाची बदनामी करु नये. सुरुवातीला कोणी आपला माल घेणार नाही. त्यावर निराश न होता आपण आपली मार्केटिग चालू ठेवावी. ग्राहकांच्या तक्रारीना प्रतिसाद द्या. कोणते बदल हवे आहेत त्याचा अभ्यास करा.  उत्पादनातील त्रुटी असतील तर ग्राहकांना पैसे परत द्या. ग्राहक समाधानी झाला तर आपली मार्केटिग तो स्वत करेल.

English Summary: start your own spices business, keep these things for this business
Published on: 08 July 2020, 05:23 IST