News

सध्याच्या काळात आपला व्यवसाय असावा अशी प्रत्येकांची इच्छा असते. अशांसाठी एक चांगली बातमी आहे. आत्ताचे युग हे ऑनलाईन असल्याने प्रत्येक जण ऑनलाईनने वस्तू मागत असतात. सरकारही डिजिटल व्यवहारसाठी प्रोत्साहन देत आहे. शेतकऱ्यांसाठीही सरकारने ई-पोर्टल सुरू करून शेतमाल डिजिटल पद्धतीने मार्केट पर्यंत पोहोचवला आहे. जर तुम्हाला ही व्यवसाय करायचा असेल तर एक भन्नाट आयडिया आहे.

Updated on 06 April, 2020 4:35 PM IST


सध्याच्या काळात आपला व्यवसाय असावा, अशी प्रत्येकांची इच्छा असते.  अशी इच्छा बाळगणाऱ्यांसाठी  एक चांगली बातमी आहे. आत्ताचे युग हे ऑनलाईन असल्याने प्रत्येक जण ऑनलाईनने वस्तू मागत असतात.  सरकारही डिजिटल व्यवहारसाठी प्रोत्साहन देत आहे. शेतकऱ्यांसाठीही सरकारने ई-पोर्टल सुरू करून शेतमाल डिजिटल पद्धतीने मार्केट पर्यंत पोहोचवला आहे. जर तुम्हाला ही व्यवसाय करायचा असेल तर एक भन्नाट आयडिया आहे. हो अगदीच हा व्यवसायही ऑनलाईनच आहे. 

तुम्ही शेतीसह हा व्यवसाय करु शकता आणि मोठा नफा कमावू शकता. तुमच्या मळ्यात पिकलेल्या भाज्या आणि फळे तुम्ही ऑनलाईनने सहजगत्या विकून तुम्ही एका ऑनलाईन दुकानाचे मालक होऊ शकता.  शहरात किंवा आता शहरी निम्म भागातही ऑनलाईन खरेदीला लोक प्राधान्य देत आहेत. त्यामुळे आपल्या ऑनलाईन भाज्या विक्रीला नक्कीच पसंती मिळेल. आजच्या धकाधकीच्या जीवनामुळे लोकांकडे भाजी मंडईत जाण्यास वेळ राहत नाही. यामुळे आपला ऑनलाईन भाजीवाला व्यवसाय त्यांच्यासाठी फार फायदेशीर ठरेल. अनेक मोठं मोठ्या कंपन्या या व्यवसायात उतरल्या आहेत. रिलायन्स, अॅमेझॉन आणि बिग बॅसकेट, आदी कंपन्या भाजीपाला आणि फळे विक्रीचा व्यवसाय करत आहेत. छोट्या शहरातही या मोठ्या कंपन्या आपल्या शाखा सुरु करू व्यवसाय वाढवत आहेत.

पण कोणता  विचार करत आहात, घ्या निर्णय सुरू करा ऑनलाईन भाजीवालाचा व्यवसाय. आपल्याच मळ्यात पिकलेला माल पोहोचवा लाखो लोकांपर्यंत. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला एक वेबसाईट सुरू करावी लागेल. त्याला काहीतरी नाव द्यावे लागेल. हेच नाव तुम्ही ऑनलाईन व्यवसायाची ओळख होईल. त्यानंतर आपल्या वेबसाईट  योग्य पद्धतीने सजवा. म्हणजे त्यातील मालांची वर्गवारी, भाव, याची व्यवस्थीत मांडणी आपल्या वेबसाईटवर असू द्या. आकर्षक फोटो आपल्या साईटवर ठेवा. सर्व सामान्य लोकांना समजेल,  अशा पद्धतीने आपली वेबसाईट तयार करा. यासह शर्ती आणि अटी आपल्या वेबसाईटवर ठेवल्यानंतर घरपोच होणाऱ्या भाज्यांची किंमत सुनिश्चित करा.

English Summary: start your own online vegetables and fruit delivery , earn big profits
Published on: 06 April 2020, 04:34 IST