News

व्यवसायात अधिक नफा असतो, नोकरी पेक्षा व्यवसाय बरा असं अनेकजण म्हणत असतात. परंतु त्यांना व्यवसायाच्या कल्पना नसतात. म्हणजे कोणता व्यवसाय करायचा त्यापासून नफा कसा मिळेल. व्यवसायासाठी किती भांडवल लागेल, याची माहिती त्यांच्याकडे नसते.

Updated on 26 October, 2020 2:24 PM IST


व्यवसायात अधिक नफा असतो, नोकरी पेक्षा व्यवसाय बरा असं अनेकजण म्हणत असतात. परंतु त्यांना व्यवसायाच्या कल्पना नसतात. म्हणजे कोणता व्यवसाय करायचा त्यापासून नफा कसा मिळेल. व्यवसायासाठी किती भांडवल लागेल, याची माहिती त्यांच्याकडे नसते. यामुळे बऱ्याचवेळा व्यवसाय चालत नसतो. मोठी गुंतवणूक केल्याने आपल्याला नुकसान सोसावे लागते. पण तुम्हाला माहिती आहे का? कमी गुंतवणुकीतही असे व्यवसाय आहेत जे आपल्याला चांगला नफा देतील. आज आम्ही तुम्हाला अशाच काही व्यवसायाची कल्पना देणार आहोत.

Low Investment Business Ideas

1). (Dry Vegetable Shop) कोरड्या भाजीपाल्यांची दुकान

जर आपल्याला कमी भांडवलात व्यवसाय सुरू करायचा असेल तर वाळलेलेल्या म्हणजे कोरड्या भाजीपाल्याची दुकान टाकू शकतात. सध्याच्या दिवसात या व्यवसायाची क्रेझ वाढणार असून वाळलेल्या भाज्यांची मागणी देखील दिवसेंदिवस वाढत राहणार आहे. यात आपण मशरुम, सांगरी म्हणजे शेंदुडी, याची विक्री करु शकतात.

 


2). (Creche Service Business)  पाळणा घर

यासह आपण पाळणा घराची सुरुवात देखील करु शकतात. यात फार कमी गुंतवणूक लागत असते.  यात आपल्या लहान मुले संभाळायची असतात.  आजच्या घडीला या व्यवसायाची मागणीही वाढत आहे. कारण सध्या नोकरीसाठी घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. नवरा -बायको दोघेही नोकरी करतात. यामुळे त्यांच्या मुलांना घरी संभाळण्यासाठी कोणी नसते. यासाठी अशी जोडपे पाळणा घराचा शोध घेत असतात. यातून दर महिन्याला आपण चांगली कमाई करू शकतात.

 


3). (Plant Shop Business) रोपांची दुकान

जर आपल्याला शेती आणि निसर्गाशी आणि झाडांशी प्रेम असेल तर आपण रोपांची दुकान सुरू करू शकतात. हा व्यवसायही कमी गुंतवणुकीत करता येऊ शकतो. सध्या अनेकजण पर्यावरणाविषयी जागरुक होत आहेत. यामुळे हा व्यवसायही आपल्याला नफा देणारा ठरू शकतो. हा व्यवसाय आपण आपल्या घरातून करू शकतात. फक्त आपल्याला काही रोपे विकत घ्यावी लागतील. जर घरात जागा नसेल तर तुम्ही एखादा गाळा घेऊन हा व्यवसाय सुरू करू शकतात.

 

English Summary: start your business with low capital, earn big money from home
Published on: 26 October 2020, 02:23 IST