News

जर तुम्ही कमी गुंतवणुकीमध्ये स्वतःच्या पायावर स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहात. तर आपल्यासाठी फायदेशीर असलेली माहिती या लेखात मिळेल. कामाच्या सुरुवातीला आपल्या डोक्यात एकच गोष्ट येत राहते ती म्हणजे आपण एखाद्या धंद्यात जो पैसा लावत आहोत, तर पुढे यापासून आपल्याला चांगले उत्पन्न मिळेल का ?

Updated on 22 October, 2020 6:04 PM IST


जर तुम्ही कमी गुंतवणुकीमध्ये स्वतःच्या पायावर स्वतःचा एखादा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहात. तर आपल्यासाठी फायदेशीर असलेली माहिती या लेखात मिळेल. कामाच्या सुरुवातीला आपल्या डोक्यात एकच गोष्ट येत राहते ती म्हणजे आपण एखाद्या धंद्यात जो पैसा लावत आहोत, तर पुढे यापासून आपल्याला चांगले उत्पन्न मिळेल का ? त्यामुळे आमचा हाच प्रयत्न राहील की, तुम्ही एक चांगल्या व्यवसायाची सुरुवात करुन चांगला नफा मिळवाल. आपल्याला चांगली माहिती आहे त्या कामाबाबत थोडासा ऑनलाईन रीसर्च करून घेणे फायद्याचे असते. ग्रामीण भागातही आणि शहरातही हे व्यवसाय आपल्याला फायद्याचे ठरतील अशाच व्यवसायाविषयी आपण शोध घेतला पाहिजे. अभ्यास घेतला पाहिजे. आज आपण या लेखात अशाच  काही व्यवसायाची माहिती घेणार आहोत.

 ट्रान्सलेशन सर्विस

तसा आपल्याला माहिती आहे की, कोरोना महामारीमुळे बऱ्याच कंपन्या आपले काम वर्क फ्रॉम होम या पद्धतीने करत आहेत. अशा अनेक कंपन्या आहेत की अशा कंपन्या स्वतःसाठी ट्रान्सलेशन सर्विससाठी लोकांना नोकरीवर घेत असतात. जर एखाद्या भाषेचे ट्रान्सलेशन तुम्ही उत्तम पद्धतीने करत असाल तर हा पर्याय तुम्हाला घरी बसून चांगल्या प्रकारचा पैसा मिळवून देऊ शकतो. आपल्याला माहिती आहे की इंग्रजी भाषेचा वापर अधिक होत आहे. सध्या अनेक कंपन्या इंग्रजी भाषेसाठी ट्रान्सलेशन सर्विसची मागणी करतात. जर तुम्हाला इंग्रजी चांगली येत असेल तर तुम्ही घरी बसून ट्रान्सलेशन सर्विस सुरू करू शकता. हा पर्याय तुमच्यासाठी चांगल्या उत्पन्नाचा स्त्रोत म्हणून उदयास येऊ शकतो. जेवढे चांगल्या पद्धतीने तुम्ही ट्रान्सलेशन कराल तितके जास्त पैसे तुम्हाला मिळतील. काही कंपन्या इंग्रजीशिवाय इतर भाषांसाठी ट्रान्सलेशन सर्विस नोकरीवर ठेवतात. यासाठी हे गरजेचं नाही की तुम्ही इंग्रजी भाषेचे हिंदी ट्रान्सलेट करावे दुसऱ्या भाषांना सुद्धा तुम्ही इंग्रजी आणि हिंदी किंवा इतर भाषांमध्ये ट्रान्सलेट करू शकता. टेक्नॉलॉजीच्या वाढीनंतर कंपन्यांना विदेशातून येणारे सामान आणि त्याबरोबरच बिझनेस करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांची गरज आहे आणि ही गरज वाढतच आहे. या सर्विसमध्ये ऑनलाईन काम सर्च करू शकता. या प्रकारच्या कामांमध्ये प्रति शब्दानुसार पैसे दिले जातात. त्यासाठी आपल्याला प्रति शब्द दहा पैसे पासून दोन रुपयांपर्यंतचे दर आपण घेऊ शकतात.

 


डान्स क्लास

 याशिवाय तुम्हाला चांगला डान्स करता येत असेल तर तुम्ही इतरांनाही डान्स शिकवू शकता. त्यासाठी आपण आपल्या स्वतःचा डान्स क्लास सुरू करू शकतात. हे काम सुद्धा घरी बसून करता येण्यासारखे आहे, हा Zero investment Business आहे, त्यामुळे लॉस होण्याचाही कुठल्या पद्धतीची भीती नाही. हा जसा तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरांमध्ये रिकाम्या वेळेत करू शकता. हक्काच्या काळामध्ये असे बरेच लोक आहेत त्यांना डान्स शिकण्यामध्ये रुची आहे आणि शिकण्यासाठी असे लोक चांगले पैसे सुद्धा देतात. त्यामुळे तुम्ही डान्स टीचर बनवून लोकांना डान्स शिकू शकता.

English Summary: Start these Zero investment Business; earn more money
Published on: 22 October 2020, 06:03 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)