News

मागच्या आठवड्यापासून चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांमध्ये सुरू असलेला नवीन आणि जुन्या व्यापाऱ्यांच्या भांडणामुळे चांदवड बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद आहेत.सोमवारी देखील हे लिलाव ठप्प असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती.

Updated on 18 January, 2022 12:25 PM IST

मागच्या आठवड्यापासून चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांमध्ये सुरू असलेला नवीन आणि जुन्या व्यापाऱ्यांच्या भांडणामुळे चांदवड बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद आहेत.सोमवारी देखील हे लिलाव ठप्प असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची खूप मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती.

या प्रकारामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्रराज्य कांदा उत्पादक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात सोमवारी पत्र दिले. जर बंद असलेल्या कांदा लिलाव पूर्ववत सुरू झाला नाही तर मुंबई-आग्रा महामार्ग चांदवड येथे  आडवून  रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला. नाशिक जिल्ह्यातील विविध प्रकारच्या बाजार समित्यांमध्ये काही व्यापाऱ्यांनी आपली मक्तेदारी सुरू केले असून शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हव्या त्या प्रमाणात दर मिळत नाही.

बाजार समिती नवीन व्यापाऱ्यांना  परवाने देऊन दर मिळण्यासाठी व्यापाऱ्यांमध्ये स्पर्धा वाढवत असते. असाच प्रकार चांदवड कृषी व्यापारी बाजार समितीमध्ये देखील झाला.परंतु चांदवड येथे जुने व्यापाऱ्यांनी लिलावात सहभागी न होता लिलाव बंद पाडले. 11 जानेवारीपासून हा वाद सुरू असून अद्यापही यावर कुठल्याही प्रकारचा तोडगा निघालेला नाही.सोमवारी देखील या वादामुळे कांदा लिलाव बंद होते. 

त्यामुळे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला लेखी पत्र दिले.यासंदर्भात बाजार समितीतील व्यापाऱ्यांशी असलेला वादावर कायमस्वरूपी तोडगा काढून कांदा लिलाव पूर्ववत करावेत अशी मागणी केली.अन्यथा रस्ता रोको करण्याचा इशाराही या वेळी दिला.

English Summary: start onion market immediately neverthless do movement of road block in chanvad
Published on: 18 January 2022, 12:25 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)