News

खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विट च्या माध्यमातुन बारामती लोकसभा मतदार संघात चारा छावण्या आणि पाण्याचे टँकर सुरू करा,टंचाईचा आढावा घ्या,अशी शासनाकडे मागणी केली आहे.

Updated on 31 January, 2024 5:17 PM IST

बारामती:यंदा अपेक्षित पाऊस झाला नसल्याने अनेक ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली.त्यातच सद्या बारामती लोकसभा मतदारसंघात यावर्षी नेहमीपेक्षा अतिशय कमी पाऊस झाला.चारा आणि पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे.शासनाला ही सर्व परिस्थिती दिसत असूनही त्यावर योग्य ती उपाययोजना होताना दिसत नाही.ही अतिशय खेदाची बाब आहे.अशी टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. शासनाने तातडीने टंचाईचा आढावा घेऊन बारामती लोकसभा मतदार संघात चारा छावण्या आणि पाण्याचे टँकर सुरू करावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

महाराष्ट्रात अनेक भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.त्यात सद्या बारामती लोकसभा मतदारसंघात यावर्षी नेहमीपेक्षा अतिशय कमी पाऊस झाला.पिण्याच्या पाण्याची देखील मोठी टंचाई निर्माण झाली आहे.नागरिकांवर पाण्यासाठी दाही दिशांना भटकण्याची वेळ आलीय.मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यानी बारामती लोकसभा मतदारसंघातील टंचाईचा आढावा घेऊन तातडीने चारा छावण्या आणि पाण्याचे टॅंकर सुरु करण्याबाबत निर्णय घ्यावा, अशी त्यांची मागणी आहे.खासदारांना सुळे यांनी याबाबत ट्विट केले, असून मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांना टॅग करत लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

सुप्रिया सुळे यांनी ट्विट मध्ये म्हटले

 बारामती लोकसभा मतदारसंघात यावर्षी नेहमीपेक्षा अतिशय कमी पाऊस झाला.चारा आणि पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना पशुधन जगवावे कसे याची चिंता आहे. पिण्याच्या पाण्याची देखील मोठी टंचाई निर्माण झाली आहे.नागरिकांवर पाण्यासाठी दाही दिशांना भटकण्याची वेळ आलीय. आणखी उन्हाळा सुरू व्हायचा तोवर हि परिस्थिती असून ती पुढील काही दिवसांत आणखी भीषण होऊ शकते. शासनाला हे सर्व दिसत आहे पण तरीही त्यावर योग्य ती उपाययोजना होताना दिसत नाही. हि अतिशय खेदाची बाब आहे. नागरिकांना होणारा त्रास बघूनही शासन शांत कसे बसू शकते याचे आश्चर्य वाटते.
माझी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की आपण कृपया बारामती लोकसभा मतदारसंघातील टंचाईचा आढावा घेऊन तातडीने चारा छावण्या आणि पाण्याचे टॅंकर सुरु करण्याबाबत निर्णय घ्यावा.

English Summary: Start fodder camps and water tankers, Supriya Sule's demand to the government water issues
Published on: 31 January 2024, 05:17 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)