आपण जर गाईच्या शेणापासून पेंट बनवण्याचा व्यवसाय सुरु करण्याच्या विचारात असाल तर बिनधास्त पुढे पाऊल टाका. या व्यवसायात यशस्वी बनण्यासाठी नेमके काय केले पाहिजे, कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, याचे प्रशिक्षण अवघ्या 5000 रुपयांत मिळणार आहे. केवळ सात दिवस व्यवसायाचे धडे घेता येतील.
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी टाकाऊपासून काही उपयुक्त बनवण्याच्या उपक्रमात पुढाकार घेतला आहे. गाईच्या शेणापासून पेंट बनवणे हा व्यवसायदेखील त्यांच्याच उपक्रमाचा भाग आहे.शेतकऱ्यांचे उपन्न वाढवणे हा उद्देश समोर ठेवून केंद्रीय मंत्री गडकरी यांनी ही कल्पना अंमलात आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. गडकरी यांनी या योजनेबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना विस्ताराने माहिती दिली.
शेणापासून पेंट बनवण्याच्या कारखान्याबद्दलही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, बाजारात डिस्टेंपर आणि इनेमल पेंट उपलब्ध आहे. दोन्ही पेंट खादी ग्रामोद्योगच्या जयपुर येथील कुमारप्पा इंस्टीट्यूटच्या लोकांनी मिळून बनवले आहे. भारतात एकूण पशुधनची संख्या 535.78 दशलक्ष आहे.देशातील प्रत्येक गावामध्ये जनावरे आहे. याचाच विचार करून प्रत्येक गावामध्ये पेंट बनवण्याची फॅक्टरी खोलण्याची आमची योजना आहे. प्रत्येक गावात फॅक्टरी खोलण्यामुळे देशभर 12 ते 15 लाख फॅक्टरी खुल्या होऊ शकतात.
डिस्टेंपर आणि ऑइल पेंट ग्रामीण भागातही बनण्यास सुरूवात होईल. यासाठी सध्या एक किलो शेण 5 रुपये किलोच्या भावाने खरेदी केले जाईल. जर कोणी स्टार्टअपच्या माध्यमातून या व्यवसायाची सुरुवात करणार असेल, तर त्या व्यक्तींना खादी ग्रामोद्योग कमिशनकडून 5 हजार रुपयांत जयपूरमध्ये प्रशिक्षण दिले जात आहे.
ब्रँडेड पेंटच्या जागी नैसर्गिक पेंटचा वापर
शेणापासून बनवलेले पेंट ब्रँडेड इनेमल पेंट आणि डिस्टेंपर पेंटचे आंतरराष्ट्रीय पातळीवर आखून देण्यात आलेल्या नियमावलीचे पूर्तता करते. गडकरी यांनी त्यांचे कार्यालय आणि घर दोन्ही ठिकाणी शेणापासून बनवलेल्या पेन्टपासून रंगकाम केले आहे. हे रंगकाम पाहून कुणाचाही विश्वास बसणार नाही कि रंगकामासाठी वापरलेले पेंट शेणापासून बनवलेले आहे. .
यापुढे पंतप्रधान आवास योजना, सरकारी कार्यालये आदी ठिकाणी ब्रँडेड पेंटच्या जागी नैसर्गिक पेंटचा वापर केला जाईल, असेही केंद्रीय मंत्री गडकरी यांनी जाहीर केले
Published on: 23 March 2021, 03:17 IST