सर्वांना हसवणारा आणि कधी भावनिक करणारा मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेता प्रदीप पटवर्धन यांचे निधन झाले आहे. यामुळे सर्वांना धक्का बसला आहे. त्यांना हृदयविकाराच्या तीव्र झटका आला.
त्यांनी आतापर्यंत अनेक मराठी नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या होत्या. त्यांनी कॉलेज काळापासूनच एकांकिका स्पर्धेत काम केले होते. मोरूची मावशी हे त्यांचे नाटक खूप गाजले होते. या नाटकामुळे त्यांना मनोरंजन सृष्टीमध्ये एक वेगळीच ओळख मिळाली होती.
प्रदीप पटवर्धन हे गिरगावात राहत होते. त्यांनी अनेक नाटकात, चित्रपटात आणि मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच त्यांनी नवरा माझा नवसाचा, लावू का लाथ, भुताळलेला, नवरा माझा भवरा, डोम, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय, जमले हो जमले अशा अनेक लोकप्रिय मराठी चित्रपटांमध्ये काम केले होते.
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या आमदारांचे बंधू शिवसेनेत, राष्ट्रवादीला मोठा धक्का..
त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांनी अनेक विनोदी भूमिका साकारल्या आहेत. यामुळे त्यांची उणीव जाणवणार आहे. अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
महत्वाच्या बातम्या;
आता बिहारचा नंबर! उद्या बिहारमध्ये नवीन सरकार स्थापन होणार? जेडीयूने खासदार-आमदारांची बैठक..
शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांना नोटीस; राज्याच्या राजकारण खळबळ
काझडमध्ये मोफत बियाणे वाटप, पोषणयुक्त आहारासाठी सरकारचा प्रयत्न, शेतकऱ्यांचा मोठा प्रयत्न
Published on: 09 August 2022, 11:08 IST