News

प्रत्येकाचे स्वप्न असते की आपले स्वतःचे घर असावे. यासाठी नवीन वर्षात शेतकऱ्यांसाठी बँक ऑफ इंडियाने स्टार किसान घर नावाची विशेष कर्ज योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना घराच्या बांधणी पासून तर दुरुस्ती पर्यंत कर्ज उपलब्ध केले जाणार आहे

Updated on 05 January, 2022 7:21 PM IST

प्रत्येकाचे स्वप्न असते की आपले स्वतःचे घर असावे. यासाठी नवीन वर्षात शेतकऱ्यांसाठी बँक ऑफ इंडियाने स्टार किसान घर नावाची विशेष कर्ज योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना घराच्या बांधणी पासून तर दुरुस्ती पर्यंत कर्ज उपलब्ध केले जाणार आहे

बँक ऑफ इंडियाने शेतकरी खातेदारांसाठी  स्टार किसान घर कर्ज योजना आणली आहे.या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवर फार्म हाऊस बनवायचे असेल किंवा अगोदरच असलेल्या फार्मचे दुरुस्ती करायची असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो.

स्टार किसान घर योजनेचे स्वरुप

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांचे घर बांधण्यासाठी बँक ऑफ इंडिया 8.05 टक्के व्याजदराने 50 लाख रुपयांपर्यंत कर्ज देत आणि त्याचा परतफेडीचा कालावधी देखील 15 वर्षे असेल.

या योजनेअंतर्गत बँक ऑफ इंडिया  शेतकऱ्यांना फार्महाऊस किंवा घर बांधण्यासाठी  किसान क्रेडिट कार्ड सुविधा सोबत एक लाख ते पन्नास लाख रुपये कर्जदेईल, अन्यथा अगोदरच घर असेल तर त्याच्या दुरुस्तीसाठी एक लाख ते 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज देईल. जे शेतकरी या योजनेचा लाभ देतील अशा शेतकऱ्यांना आयटीआर ची गरज नाही.

या योजनेच्या अधिक माहितीसाठी तुम्ही बँक ऑफ इंडियाच्या जवळच शाखेला भेट देऊ शकता अन्यथा बँक ऑफ इंडिया टोल फ्री क्रमांक 18001031906 वर कॉल करून अथवा बँकेचे अधिकृत संकेतस्थळलाभेट देऊ शकता.(संदर्भ-नाशिक लाईव्ह)

English Summary: star kisan ghr karj yojana to do help to farmer for construction to home
Published on: 05 January 2022, 09:17 IST