आजकालच्या काळामध्ये सगळेजण कमी गुंतवणुकीत चांगला व्यवसाय सुरू करू इच्छिता. जर तुमची ही अशा प्रकारची कमी गुंतवणुकीत चांगला व्यवसाय स्थापन करण्याची इच्छा असेल तर या लेखामध्ये आम्ही तुम्हाला बिझनेस आयडिया देणार आहोत. त्याद्वारे तुम्ही कमी गुंतवणुकीत चांगला व्यवसाय करू शकता.
हा दिवस म्हणजे स्टॅम्प पेपर वे डर चा आहे. तुम्ही सहजतेने स्टॅम पेपर विक्रेता होऊ शकतात. आजकाल बरेच कामांमध्ये स्टॅम्प आवश्यकता पडते. जर तुम्हाला हा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही सरकार कडून लायसन्स मिळून अधिकृत वेंडर बनू शकता.
कुठे मिळते स्टॅम पेपर विक्री साठीचे लायसन्स
-
जर तुम्हाला स्टॅम्प पेपर विक्री त्यासाठीचे परवाना हवा असेल तर तो तुम्हाला राज्यसरकारच्या मुद्रांक विभागाकडून मिळतो.
-
त्यानंतर तुम्ही स्टॅम्प पेपर विक्री साठी रजिस्टर होऊन जाता.
-
तुम्ही एका मर्यादेपर्यंत स्टॅम्प पेपर विकू शकता.
-
बहुतेक कंप्यूटर ऑपरेटर हे काम करतात. तसेच सोबत आधार, पॅन कार्ड, तसेच अन्य सरकारी योजनांविषयी काम करून चांगला पैसा कमावतात.
आता पाहिले तर बऱ्याच राज्यांनी वे डर साठीच्या अर्जाची प्रक्रिया ऑनलाइन केली आहे. अशा परिस्थितीत जे राज्य ऑनलाईन सुविधा देत आहेत तिथे तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. तसेच आता ई स्टॅम्प पेपर जास्त वापरले जात आहेत. आता बहुतेकदा अगोदर सारखे स्टॅम्प पेपर नाही मिळत. अशा पद्धतीने तुम्ही ई स्टॅम्प पेपर प्रिंटचा व्यवसाय करू शकतात. यासाठीसुद्धा सरकार लायसन्स देते.
ऑफलाइन अर्जाची प्रक्रिया
बहुतेक शहरांमध्ये ऑफलाईन अर्ज करावे लागतात. त्यासाठी तुम्हाला सरकारच्या राजस्व विभाग मधून फॉर्म घेऊन तो जमा करावा लागतो. परवानामिळाल्यानंतर तर तुम्ही तहसील मधे कुठेही आपले स्टॅम्प पेपर विक्री चे दुकान उघडू शकता.
आवश्यक कागदपत्रे
जर तुम्हाला इ स्टॅम्प बनवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला काय कागदपत्रे सरकारकडे जमा करावी लागतात. त्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, सीएससी आयडी, ई-मेल आयडी, शाळेचे प्रमाणपत्र, मोबाईल नंबर इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता भासते.या व्यवसायामध्ये स्टॅम्प पेपर विक्री वर कमिशन मिळते. अगोदर एका स्टॅम्प वर वेंडर जास्त पैसे घेत. परंतु आता ई स्टॅम्प आल्याने तुम्ही त्याच्या विक्रीतूनही चांगला पैसा कमवू शकतो.
Published on: 20 February 2021, 05:23 IST