News

प्रशासनाच्या सकारात्मकतेमुळे आज वांग-मराठवाडी प्रकल्पग्रस्तांचे चांगले पुनर्वसन झाले आहे. त्यांना जमिनीच्या ऐवजी रोख रक्कम दिली जात आहे. या रक्केतून त्यांनी शेत जमिन घेतल्यास त्यावरील मुद्रांक शुल्क माफ करण्यासाठी प्रयत्न करीन, असे आश्वासन आज पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिले.

Updated on 13 August, 2018 11:36 PM IST

प्रशासनाच्या सकारात्मकतेमुळे आज वांग-मराठवाडी प्रकल्पग्रस्तांचे चांगले पुनर्वसन झाले आहे. त्यांना जमिनीच्या ऐवजी रोख रक्कम दिली जात आहे. या रक्केतून त्यांनी शेत जमिन घेतल्यास त्यावरील मुद्रांक शुल्क माफ करण्यासाठी प्रयत्न करीन, असे आश्वासन आज पालकमंत्री विजय शिवतारे यांनी दिले.

उमरकांचन ता. पाटण येथे धरणग्रस्तांच्यावतीने नवजीवनोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पालकमंत्री विजय शिवतारे बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, अधीक्षक अभियंता विजय घोगरे, मेधा पाटकर, माजी आमदार नरेंद्र पाटील, सुनीता सु.र. प्रांताधिकारी हिम्मत खराडे, श्रीरंग तांबे, जिल्हा पुनर्वसन अधिकारी आरती भोसले, तहसीलदार रामहरी भोसले, कार्यकारी अभियंता संजय बोडके, भरत पाटील, हिंदूराव पाटील, सुनिल मोहिते, सतीश भिंगारे आदी यावेळी उपस्थित उपस्थित होते.

सर्वसामान्यांना न्याय देण्याची शासनाची भूमिका असल्याचे सांगून पालकमंत्री विजय शिवतारे पुढे म्हणाले, आता मोठी धरणांची निर्मिती करणे अशक्य आहे. यामुळे जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून गावोगावी शाश्वत पाणी निर्माण होत आहे. याचे दृष्यपरिणाम आज दिसत असून शेतकऱ्यांच्या उत्पादनात चांगली वाढ झालेली आहे. सिंचन क्षमता वाढल्याशिवाय शेतकऱ्यांचा तसेच देशाचा विकास होणार नाही. सर्वांना पाणी मिळाले पाहिजे. ही शासनाची भूमिका आहे. यापुढे कोणताही प्रकल्प उभा करताना विस्थापितांना केंद्र बिंदू ठेवून  योजना तयार केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड म्हणाले, वांग-मराठवाडी धरणग्रस्तांचा प्रश्न प्रामणिकपणे सोडविण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे. गेल्या दोन महिन्यात 72 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. पुनर्वसनाचे आणखीन काही प्रश्न असतील ते सकारात्मक पद्धतीने सोडविले जातील, असेही त्यांनी शेवटी सांगितले.

यावेळी मेधा पाटकर म्हणाल्या, पर्यावरणाचा विचार करुन शासनाने धरणे बांधली पाहिजे. धरणग्रस्तांचे पुनर्वसन आधी, मग धरण बांधले पाहिजे. यामुळे संघर्ष होणार नाही. वांग-मराठवाडी धरणात मस्त्य व्यवसाय सुरु करा, पर्यटन प्रकल्प उभा करा. याचे सर्व हक्क स्थानिकांना द्या. तुम्हाला जी रोख रक्क्म मिळाली आहे याचा योग्य वापर करा. शासनानेही कोणावर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असेही त्यांनी शेवटी सांगितले.

यावेळी माजी आजी आमदार नरेंद्र पाटील, भरत पाटील, अधीक्षक अभियंता विजय घागरे, सुनीती, सु.र. यांनीही आपली मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिल मोहिते यांनी केले तर आभार विद्या मोहिते यांनी मानले. या कार्यक्रमास वांग-मराठवाडी धरणग्रस्तांबरोबर विविध विभागांचे अधिकारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

English Summary: Stamp Duty waiver for the Purchase of Agriculture Land
Published on: 13 August 2018, 11:10 IST