News

सध्या शेतीत नव-नवीन प्रयोग केले जात आहे. नव्या पद्धतीने पिकांची लागवड केली जात असल्याने उत्पन्नात वाढ झाली आहे. भाजीपाला उत्पादक शेतकरी भाज्यांचे उत्पादन घेताना नवीन पद्धतीचा अवलंब करत आहेत. आज आपण अशाच एका पद्धतीविषयी जाणून घेणार आहोत.

Updated on 09 May, 2020 2:26 PM IST


सध्या शेतीत नव-नवीन प्रयोग केले जात आहे. नव्या पद्धतीने पिकांची लागवड केली जात असल्याने उत्पन्नात वाढ झाली आहे. भाजीपाला उत्पादक शेतकरी भाज्यांचे उत्पादन घेताना नवीन पद्धतीचा अवलंब करत आहेत.  आज आपण अशाच एका पद्धतीविषयी जाणून घेणार आहोत. कोणी शेतकरी भाजीपाल्याची लागवड करत असेल तर तुम्ही ही पद्धत नक्कीच वापरली पाहिजे.  ही पद्धत आहे, स्टॅकिंग यातून तुमचे उत्पन्न नक्की वाढेल.  नाव इंग्रजीत जरी असेल तरी ही पद्धत पुर्णपणे आपल्या देशी आहे.

स्टॅकिंग पद्धत काय आहे?

या पद्धतीत बांबूचा वापर करून वायर आणि दोरीचे जाळे तयार केले जाते. यावर वनस्पतींच्या वेली पसरवल्या जातात.  ही पध्दत अवलंबून शेतकरी वांगी, टोमॅटो, मिरचीसह भोपळ्याची लागवड करु शकता. बऱ्याच गावातील शेतकरी स्टॅकिंग पद्धतीने शेती यशस्वीरित्या करत आहेत. या पद्धतीमुळे पिके सुरक्षित राहतात. यामुळे त्यांना बाजारात चांगला भाव मिळतो.

स्टॅकिंग पद्धत अवलंबण्याची पद्धत

जर शेतकऱ्यांना या पद्धतीने भाज्यांची लागवड करायची असेल तर प्रथम बांबूचे १० फुट उंच खांब १० फुटाच्या अंतरावर बांधाला गाडावेत.  त्यानंतर काठ्यांवर २-२ फुट उंचीवर तार बांधावीत. त्यानंतर वेलींना किंवा झाडांना सुतळीच्या मदतीने त्या तारांना बांधून द्या. जेनेकरुन वेली किंवा झाडे त्या बाजूने वाढतील.  याप्रमाणे झाडांची उंचीही ८ फूट होत असते आणि त्यानंतर झाडे मजबूत होत उत्पन्न अधिक देत असतात.

स्टॅकिंग पद्धतीचा फायदा

या पिकांच्या झाडांना आधार मिळाल्याने हे झाडे खाली वाकत नाहीत. यामुळे पद्धतीच्या मदतीने टोमॅटो, वांगे, मिरची, सडण्यापासून वाचू शकते. वेली फळ भाज्यांचा अधिक भार सहन करु शकत नाहीत. त्यामुळे या पद्धतीमुळे वेलींना आधार मिळतो.  जर फळ भाज्या खाली ओलाव्यात पडून राहतील तर त्या सडून जात असतात.  परंतु या पद्धतीमुळे तो धोका टळतो. यासह फळ भाज्यांच्या वजनामुळे झाडे वेली तुटून जात असतात. पण स्टॅकिंगमुळे मात्र हाही धोका टळत असतो.

English Summary: stacking method useful to vegetables farming
Published on: 09 May 2020, 01:57 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)