News

भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन ‘किसान’ला १३ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. हे प्रदर्शन १३ डिसेंबरपासून ते 17 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र, मोशी पुणे येथे हे कृषी प्रदर्शन सुरू आहे. हे प्रदर्शन १५ एकर क्षेत्रांवर असून, या प्रदर्शनात ५०० हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था सहभागी झाल्या आहेत.

Updated on 14 December, 2023 6:29 PM IST

भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन ‘किसान’ला १३ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. हे प्रदर्शन १३ डिसेंबरपासून ते 17 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र, मोशी पुणे येथे हे कृषी प्रदर्शन सुरू आहे. हे प्रदर्शन १५ एकर क्षेत्रांवर असून, या प्रदर्शनात ५०० हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था सहभागी झाल्या आहेत.

हे प्रदर्शन पाच दिवशीय प्रदर्शन असून, किसान प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट आधुनिक तंत्रज्ञान व नवे विचार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हे आहे. यंदा किसान प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषी निविष्ठा, यंत्रसामग्री, पशुधन, जैव, ऊर्जा, वाटिका व शेती लघू उद्योग अशी विविध दालने उभी करण्यात आलेली आहेत. तसेच या प्रदर्शनात कृषी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान आणि त्यामधून निर्माण होणाऱ्या संधींची माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कार्यक्रमाला शेतकऱ्यांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे.

कृषी जागरणचे संस्थापक एम.सी. डॅामिनिक यांनी या कार्यक्रमावेळी त्यांचे मत मांडले, ते म्हणाले की महाराष्ट्र एग्रीकल्चर मध्ये सर्वात पुढे आहे. आपण आयोजित केलेल्या मिलिनिअर फार्मर ऑफ इंडिया या कार्यक्रमात सर्वात जास्त पुरस्कार महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी घेतले आहेत. त्याचबरोबर या किसान प्रदर्शनातही शेतकऱ्यांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आमचा हाच उद्दिष्ट आहे की शेतकरी सुद्धा शेतीतून चांगले पैसे कमवू शकतात मिलेनियर होऊ शकतात ही भावना शेतकऱ्यांच्या मनात रुजावी. आमचा हा प्रयत्न आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक आदर्श शेतकरी असावा जेणेकरून त्याची प्रेरणा इतर शेतकरी घेतील.

त्याचबरोबर शेतीतून जास्तीचे उत्पादन कसे घेता येईल त्यातून जास्तीचा पैसा कसा कमावता येईल हे सुद्धा मार्गदर्शन आमच्याकडून शेतकऱ्यांना करण्याचा प्रयत्न करत आहोत. तसेच आम्ही लवकरच प्रत्येक गावापर्यंत प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यांना आर्थिक दृष्ट्या क्षम करण्याचा प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्रातील शेतकरी फार कष्टाळू आहेत त्यामुळे येत्या काही काळात सर्वच शेतकरी लखपती झाल्याचं आपल्याला पाहायला मिळेल असेही कृषी जागरणचे संस्थापक एम.सी. डॅामिनिक म्हणाले.

English Summary: Spontaneous response from farmers to India's largest agricultural exhibition 'Kisan'
Published on: 14 December 2023, 06:29 IST