
निरोगी राहण्यासाठी आपल्या शरिरात रोगप्रतिकारक शक्ती आवश्यक असते. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असलेली व्यक्ती अनेक आजारांपासून स्वत:च संरक्षण करु शकते. सध्या देशात कोरोनाचे इन्फेक्शन वेगाने पसरत आहे. अशा परिस्थितीत आजारांपासून वाचण्यासाठी तुम्ही सुद्धा तयार असणे गरजेचे आहे. रोगप्रतिकारक शक्ती चांगली असली तर कोरोनाच्या विषाणूची लागण होण्याची शक्यता कमी असते. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अनेक घरगुती उपाय आहेत. असाच एक आम्ही घरगुती उपाय सांगत आहोत.
रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचा सोपा उपाय म्हणजे पालक ज्यूस. या ज्यूसचा आपल्या आहारात समावेश करुन तुम्ही स्वत:च आरोग्य चांगले ठेवू शकता. नावावरून तुम्हाला समजलेच असेल की, हा ज्यूस पालकपासून बनतो असे. पालकात अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे शरिराला पोषण मिळत असतं. रोज सकाळी संध्याकाळी पालकाच्या ज्यूसचे सेवन करुन तुम्ही स्वत :ला कोरोना व्हायरसपासून नाही तर अनेक आजारांपासून लांब ठेवू शकता. पुढील पद्धतीने तुम्ही पालक ज्यूस तयार करु शकता. एक कप कापलेली पालक आणि अर्धा कप पाणी घ्या. आधी कापलेला पालक पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. नंतर ज्यूसरमध्ये बारीक करुन घ्या. नंतर पाणी घालून ज्यूस करुन घ्या. मग हा ज्यूस काढून घ्या. याला जिरे आणि मीठ टाकून याचे तुम्ही सुप पण बनवू शकता.