News

मुंबई: राज्य शासनाने ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडण्यासाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे (Gopinathrao Munde) ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना केली असून पुणे (Pune) येथे महामंडळाचे मुख्यालय सुरु झाले आहे.

Updated on 07 November, 2022 1:54 PM IST

मुंबई: राज्य शासनाने ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडण्यासाठी लोकनेते गोपीनाथराव मुंडे (Gopinathrao Munde) ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना केली असून पुणे (Pune) येथे महामंडळाचे मुख्यालय सुरु झाले आहे.

ऊसतोड कामगारांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक तथा समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत ननवरे (Dr. Prashant Nunavre) यांनी आज रोजी माजलगाव महेश साखर कारखाना बीड परिसरात प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन ऊसतोड कामगारांसोबत चर्चा करुन त्यांचे प्रश्न जाणून घेतले आहे.

हेही वाचा: प्राण्यांना थंडी पासून वाचवण्यासाठी करा या उपाययोजना; हमखास होणार फायदा

त्यामुळे महामंडळाच्या कामकाजाला वेग आला आहे. या महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांसाठी विविध योजना तयार करण्यात येत असून त्याअंतर्गत ऊसतोड कामगारांसाठी शासनाने व्यापक मोहीम राबवून ओळख प्रमाणपत्रांचे वाटप केले आहे.

हेही वाचा: एकदाचा प्रश्न सुटला! कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार 1.50 लाख रुपये!

यावेळी औरंगाबाद (Aurangabad) विभागाचे प्रादेशिक उपायुक्त जलील शेख, प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण कार्यालय पुणेचे बाळासाहेब सोळंकी, रविंद् शिंदे, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय बीड, ऊसतोड कामगार संबधाचे पदाधिकारी, ऊसतोड कामगार, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी यांच्यासह विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

हेही वाचा: शेवग्याच्या झाडाची पाने आहेत खूपच फायदेशीर, जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

English Summary: Speed up the work of Gopinathrao Munde Sugar Cane Workers Welfare Corporation
Published on: 07 November 2022, 01:54 IST