News

छत्रपती संभाजीनगर येथे उभारण्यात येत असलेल्या स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला आणि इतर कामांना गती मिळावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

Updated on 01 September, 2023 4:49 PM IST

छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर येथे उभारण्यात येत असलेल्या स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला आणि इतर कामांना गती मिळावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. 

पैठण येथील नाथसागर परिसरातील संत ज्ञानेश्वर उद्यान आणि तेथील परिसराचा विकास जलसंपदा विभागाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यामुळे हे उद्यान प्रादेशिक पर्यटन आराखड्याअंतर्गत जलसंपदा विभागाच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे.

अजिंठा लेणी परिसर बृहत आराखड्यांतर्गत सुमारे २३१ हेक्टर जमीन संपादित केली आहे. याठिकाणी नियोजनानुसार विविध पर्यटनस्थळ साकारण्यात येणार आहे. या कामाला गती देण्याच्याही सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्यात. 

दरम्यान, वैजापूर तालुक्यातील रामकृष्ण गोदावरी उपसा जलसिंचन योजनेचे कर्ज एकरकमी परतफेड करून शेतकऱ्यांच्या जमिनीवरील बोजा कमी करणे, ही योजना जलसंपदा विभागाने ताब्यात घेणे. तसंच ऊर्जा विभागाशी निगडीत विविध विषय, फुलंब्री परिसरातील बायपास रस्ता, या परिसरात आयटीआय उभारणी असे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी जिल्हाधिकारी तसेच संबंधित विभागांना दिले आहेत.

English Summary: Speed ​​up Balasaheb Thackeray memorial Chief Minister orders
Published on: 27 July 2023, 12:42 IST