सध्या महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून उभे आहेत. जर आपण विचार केला तर असे कुठलेही क्षेत्र नाही की त्यात महिलांचा सहभाग नाही. अगदी प्रशासनातील उच्च पद असो की विमानातील पायलट या सगळ्या क्षेत्रात महिला पुढे आहेत.
महिला सक्षमीकरणासाठी सरकारकडून देखील अनेक कौतुकास्पद पावले उचलली जात आहेत. याच पार्श्वभूमीवर महिलांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी पुणे जिल्हा परिषदेने एक विशेष मोहीम राबवून जवळजवळ ग्रामीण भागातील सहा लाख पेक्षा जास्त महिलांना त्यांच्या पतीच्या मालमत्तेत हक्क मिळवून दिला आहे.
नक्की वाचा:हायपरटेन्शन म्हणजे नेमके काय आहे? काय आहेत त्याची लक्षणे आणि कारणे? वाचा सविस्तर
अजूनही बऱ्याच महिलांना त्यांचा हा हक्क मिळाला नसल्यामुळे जे कुटुंब राहिले आहेत त्याची तात्काळ प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
पुणे जिल्हा परिषदेची विशेष मोहीम
पुणे जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामपंचायतीने महाफेरफार अभियानाच्या माध्यमातून आठ अ म्हणजेच मिळकत पत्रिकेवर महिलांच्या नाव यांचा अंतर्भाव करण्यासाठी विशेष मोहीम राबवली होती. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला असून या स्वामित्व योजनेच्या अंतर्गतघरातील स्त्रियांना मालमत्तेतील मालकी हक्क मिळणार असून हे पाऊल एक महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाचा भाग आहे.
नक्की वाचा:4 पायऱ्यांचा अवलंब करा आणि यशस्वी व्हाल किराणा दुकान व्यवसायात
यासाठी जिल्हा परिषदेने कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतींना त्याबाबतच्या सूचना देऊन मिळकत पत्रिकेवर महिलांची नावे समाविष्ट करण्याच्या सूचना दिल्या होत्याव त्यानुसार प्रक्रिया ग्रामपंचायतींनी सुरूदेखील केली आहे.
ही वेळखाऊ प्रक्रिया असली तरी या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. जर पुणे जिल्ह्याचा विचार केला तर आठ अ मिळकतींची एकूण संख्या दहा लाखाच्या पुढे असून त्यापैकी सहा लाख 42 हजार 86 महिलांचे आठ अ म्हणजेच मिळकत पत्रिके वर नावे समाविष्ट करण्यात आली आहेत.
Published on: 19 March 2022, 11:22 IST