छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरीच्या पायथ्या पासून पुणे शहरापर्यंत बससेवा सुरु करण्यात आली आहे. जुन्नर ते भोसरी आणि पुणे असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही बस सेवा अतिशय फायदेशीर ठरणार आहे.
राज्याच्या एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असल्याने नागरीकाकांचे खूपच हाल सुरु आहेत. येथील शेतकऱ्यांना जिल्हा परिषद आणि संबंधित कामासाठी पुणे येथे नियमित प्रवास करावा लागत असे. त्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत आंदोलनामुळे आणखी किती दिवस हि बससेवा बंद राहील हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे प्रवाशांची आणखी गैरसोय होऊ नये याकरिता हि बस सेवा सुरु केली असून येथील जनतेला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे.आता पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड. (PMPML) ही बस सेवा झाल्याने नागरिकांना थेट जुन्नर ते पुणे प्रवास करता येणार आहे.
गेली अनके महिन्यांपासून एसटी बस बंद असल्याने प्रवाशांना खाजगी वाहनाने प्रवास करावा लागत होता. शिवाय अवाच्यासव्वा पैसे मोजून नागरिकांना प्रवास करावा लागत होता. मात्र आता PMPML बस सेवा किल्ले शिवनेरी ते भोसरी पर्यंत सुरू झाल्याने प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार आहे. भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आणि जिल्हापरिषद सदस्या आशाताई बुचके आणि बसचे चालक आणि वाहक यांच्या हस्ते बसची पूजा करण्यात आली. तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांच्या हस्ते नारळ फोडून ही बस सेवा सुरू झाली. यावेळी भाजपचे अनेक पदाधिकारी आणि जुन्नर शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तर आज या उदघाटन प्रसंगी श्रेयवादाची लढाई पाहायला मिळाली. तर स्थानिक आमदार अतुल बेनके यांच्या प्रयत्नांतून हि बस सेवा सुरु झाली असल्याचे राष्ट्रवादी पदाधिकारी आणि नेते सांगत आहेत. तर भाजपच्या सांगण्यावरून आम्ही हि बससेवा सुरु करण्यासाठी पाठपुरावा केला आहे. त्यामुळे या श्रेयवादावरून राष्ट्रवादी आणि भाजप आमने-सामने पाहायला मिळाले.
२५ ऑक्टोबर २०२१ रोजी संबंधित बससेवा सुरु करण्यासाठी PMPML प्रशासनाला मागणी पत्र देण्यात आले होते. त्यामुळे हि बससेवा सुरु करण्यात आली आहे. मात्र, स्थानिक भाजप कार्यकर्त्यांनी जुन्नर भाजप पदाधिकाऱ्यांना या पत्रासंबंधित माहिती देऊन हा श्रेयवाद घेण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचे आमदार अतुल बेनके यांनी सांगितले. तर याबाबत स्थानिक भाजप नेत्या आशाताई याच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन स्वीकारला नाही.
Published on: 11 February 2022, 04:34 IST