नाशिक परिक्षेत्र मध्ये असलेले पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शेतमाल विकत घेत त्यांची व्यवहारनुसार ठरलेली लाखो रुपयांची रक्कम न देता फरार झालेल्या व्यापाऱ्यांना प्रथमच पोलिसांनी चांगला हादरा दिला.
नाशिक परिक्षेत्रातील फसवणूक झालेल्या शेकडो शेतकऱ्यांच्या पदरात जवळ-जवळ साडेअकरा कोटींची रक्कम वसूल करण्यास पोलिस यंत्रणेला यश आले. या महत्वाच्या कामात खरी भूमिका पार पाडली ती नाशिकचे तत्कालीन विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी. डॉ. प्रतापराव दिघावकर हे प्रदीर्घ असलेल्या आपल्या पोलिस सेवेतून शुक्रवारी गेल्या तीस तारखेला निवृत्त झाले. स्वतः प्रतापराव दिखाव कर हे शेतकरी असल्याने फार कमी दिवसात ते शेतकऱ्यांसाठी हिरो ठरले.
जेव्हा त्यांनीनाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक पदाची सूत्रे हाती घेतली होती तेव्हा त्यांनी घेतलेल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शेतकरी फसवणूक प्रकरणांवर भर देणार असल्याचे म्हटले आणि फसवणूक करून फरार झालेल्या व्यापाऱ्यांना इशारा दिला होता. यासंबंधीनाशिक परिक्षेत्रातील पाचही जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांनी शेतकऱ्यांच्या फसवणुकीच्या बाबतीत प्राप्त झालेल्या अर्जांची युद्ध पातळीवर चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले. याचा परिणाम म्हणजे सप्टेंबर पासून ते डिसेंबरपर्यंत एकूण पाच जिल्ह्यांतून 1192 शेतकऱ्यांनी आपली फसवणूक झाल्याचे तक्रार अर्जात मांडले.
यापैकी 1161 अर्ज केवळ नाशिक ग्रामीण मधून आले आहेत. या प्राप्त झालेल्या अर्जानुसार फसवणुकीची एकूण रक्कम ही 46 कोटी 20 लाख 52 हजार 436 च्या घरात पोहोचली. या प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार 191 व्यापार्यांना गुन्हे दाखल केले गेले. यामध्ये जवळ जवळ दोनशे व्यापारी व शेतकऱ्यांमध्ये तडजोड होऊन 199 व्यापाऱ्यांनी आतापर्यंत सहा कोटी 75 लाख 88 हजार 98 रुपयांची रक्कम परत केली.
Published on: 07 May 2021, 11:22 IST