News

राज्यातील शेतपिकांवर कीटकनाशकांची फवारणी करणाऱ्या शेतमजुरांच्या नि:शुल्क आरोग्य तपासणीकरिता सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात एक विशेष अभियान राबविण्यात येणार आहे.

Updated on 02 August, 2018 10:16 PM IST

राज्यातील शेतपिकांवर कीटकनाशकांची फवारणी  करणाऱ्या शेतमजुरांच्या नि:शुल्क आरोग्य तपासणीकरिता सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत प्रत्येक जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात एक विशेष अभियान राबविण्यात येणार आहे.

कीटकनाशक फवारणी करणाऱ्या सर्व शेतमजुरांनी आरोग्य तपासणीसंदर्भात जवळच्या ग्रामीण रुग्णालयात संपर्क साधून आरोग्य तपासणी करुन घ्यावी. या अभियानांतर्गत आरोग्य तपासणी करुन घेणाऱ्या शेतमजुराला आरोग्य तपासणी प्रमाणपत्र देण्यात येईल. या उपक्रमाचा शेतपिकांवर कीटकनाशकांची फवारणी करणाऱ्या शेतमजुरांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाचे अप्पर मुख्य सचिव विजय कुमार यांनी केले आहे.

English Summary: Special Health Check-up Campaign for the Pesticides Sprayer Farm Labor
Published on: 02 August 2018, 10:15 IST