News

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत

Updated on 28 August, 2022 6:36 PM IST

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांच्या ई-केवायसीचे काम १०० टक्के पूर्ण करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.यासाठी लाभार्थ्यांच्या याद्या विविध माध्यमतून प्रसिद्ध करणे,गावपातळीवरील कर्मचाऱ्यांनी लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संपर्क करणे तसेच विशेष शिबिरे घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवर नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे.E-KYC is mandatory for beneficiaries.त्याशिवाय यापुढील लाभाचे हप्ते लाभार्थ्यास मिळणार नाहीत.ई-केवायसी न झालेल्या लाभार्थ्यांच्या याद्या संबंधित गावच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर देण्यात येणार आहेत. ग्रामपंचायत कार्यालय, चावडी, तलाठी कार्यालय, विकास संस्था, बँक,

पतसंस्था यांच्या नोटीस फलकावरही याद्या तत्काळ लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक, कोतवाल, पोलिस पाटील, सरपंच यांच्यामार्फत प्रलंबित यादीतील लाभार्थ्यांना प्रत्यक्ष किंवा दूरध्वनीद्वारे ई-केवायसीची कार्यपद्धती समजावण्यात येईल. मोबाईलद्वारे किंवा नजीकच्या ‘आपले सरकार’ सेवा

केंद्रावरही याद्या उपलब्ध करून त्याठिकाणी ई-केवायसी पूर्ण करण्यास प्रवृत्त करण्यात येईल. ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायकांना संबंधित गावांत ई-केवायसीसाठी २९, ३० व ३१ ऑगस्ट रोजी विशेष शिबिरे घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी गावांमध्ये उपस्थित राहून ई-केवायसीचे काम १०० टक्के पूर्ण करावे, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत.

English Summary: Special campaign for 'Pradhan Mantri Kisan Samman' e-KYC work till 31st
Published on: 28 August 2022, 06:36 IST