बुलढाणा जिल्ह्यातून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. जिल्ह्यात मागील पाच दिवसापासून रोजाना सोयाबीनच्या बाजारभावात वाढ नमूद करण्यात येत आहे. जिल्ह्यातील बाजारपेठाचे चित्र बघता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या पुन्हा एकदा भुवया उंचावल्या आहेत. जिल्ह्यातील लोणार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनचे दर पुन्हा एकदा गगन भरारी घेताना बघायला मिळत आहेत, सोयाबीनचे दर वाढल्याने लोणार एपीएमसीमध्ये सोयाबीनची आवक देखील वाढली आहे.
सध्या बाजारपेठेत सोयाबीनला सहा हजार रुपये प्रतिक्विंटल पासून ते सहा हजार 800 रुपये प्रति क्विंटल पर्यंत बाजार भाव प्राप्त होत असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे. सोयाबीनचे दर सात हजारांच्या घरात गेल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी साठवलेला सोयाबीन पुन्हा एकदा विक्रीसाठी काढला आहे.
खरीप हंगामात झालेल्या पावसामुळे खरिपातील मुख्य पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला होता, अवकाळी मुळे सोयाबिनच्या उत्पादनात तर घट झालीच याशिवाय सोयाबीनचा दर्जादेखील पुरता खालावला गेला आहे. सोयाबिनच्या उत्पादनात घट झाली असताना देखील दिवाळीपूर्वी सोयाबीनला खूपच कवडीमोल दर प्राप्त होत होता. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सोयाबीनची विक्री करण्याऐवजी सोयाबीनची साठवणूक करण्यास पसंती दर्शवली. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या साठवणुकीच्या निर्णयामुळे दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात वाढ बघायला मिळत आहे, मध्यंतरी सोयाबीनचे बाजार भाव सहा हजार रुपये प्रति क्विंटल वर येउन ठेपले होते. मात्र आता पुन्हा एकदा सोयाबीनचे दर लक्षणीय वाढत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. मात्र असे असले तरी, सोयाबीन उत्पादक शेतकरी सोयाबीनची विक्री करेल की अजूनही साठवणुकीवर लक्ष केंद्रित करेल याबाबत सांगणे थोडे मुश्कील आहे.
मात्र सध्या बाजारपेठेत सोयाबीन उत्पादक शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी लगबग करत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. लोणार एपीएमसीमध्ये सध्या 2500 ते 3000 हजार पोती आवक नमूद करण्यात येत आहे, तज्ञांच्या मते सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याने सोयाबीनची आवक वाढली आहे आणि जर असाच बाजारभाव कायम राहिला तर सोयाबीनच्या आवकमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे.
खरीप हंगामात झालेल्या अवकाळी मुळे सोयाबिनच्या उत्पादनात घट झाली खरी मात्र असे असले तरी सोयाबीनच्या बाजार भावात मुहूर्ताचा कालावधी वगळता नेहमीच घसरण बघायला मिळाली. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी व्यापारी धोरण अंगीकारलं आणि सोयाबीनची साठवणूक केली. सध्या लोणार एपीएमसीमध्ये समाधानकारक बाजारभाव मिळत असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा सोयाबीन विक्रीसाठी धावपळ सुरू केल्याचे बघायला मिळत आहे मात्र असे असले तरी सोयाबीनची रोजना आवक केवळ तीन हजार पोते एवढीच नमूद करण्यात येत आहे.
सलग सातव्या दिवशी सोयाबीनच्या दरात वाढ होऊन देखील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी पसंती दर्शवली नसल्याचे सांगितले जात आहे. सोयाबीनच्या फुले संगम या जातीला लोणार एपीएमसीमध्ये विशेष मागणी आहे आणि या जातीला मागणी असल्यामुळे भाव देखील अधिक मिळत आहे त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी पुरता आनंदी आहे. एवढेच नाही उन्हाळी हंगामात फुले संगम या वाणाची मोठ्या प्रमाणात लागवड केली गेली असल्याने उन्हाळी सोयाबीन पेरणी केलेल्या शेतकऱ्यांमध्ये देखील आनंद बघायला मिळत आहे.
Published on: 18 February 2022, 10:54 IST