News

परभणी येथून प्रथमच सोयाबीन बियाणांची रेल्वेने वाहतूक करण्यात आली. नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंघ यांनी बनवलेल्या बिजनेस डेव्हल्पमेन्ट युनिट (बीडीयु) च्या प्रयत्नाला यश आले आहे. नगरसोल येथून किसान रेल्वेने कांदा आणि द्राक्षे देशभरात पाठवण्यात येत आहेत.

Updated on 18 March, 2021 4:23 PM IST

परभणी  येथून प्रथमच सोयाबीन बियांणांची रेल्वेने वाहतूक करण्यात आली. नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंघ यांनी बनवलेल्या बिजनेस डेव्हल्पमेन्ट युनिट (बीडीयु) च्या प्रयत्नाला यश आले आहे. नगरसोल येथून किसान रेल्वेने कांदा आणि द्राक्षे देशभरात पाठवण्यात येत आहेत.

त्यात सोमवारपासून परभणी येथून ४२ बीसीएन वेगन्स मधून २ हजार ६६१ टन सोयाबीन सीड्स गुजरात येथील गांधीधाम येथे पाठवले आहे.मराठवाड्यात सोयाबीनचे पीक खूप मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. या सोयाबीनची वाहतूक आत्तापर्यंत खासगी ट्रक, टेम्पोने अंदाजे शहरात तसेच विदर्भात केली जात होती. परंतू सोमवारी परभणी येथून गांधीधाम (गुजरात) येथील बाजारपेठ सोयाबीनला मिळाल्यामुळे येथील शेतकऱ्यांना त्यांचा उत्पादीत केलेला कृषी माल विविध राज्यांत तसेच परदेशात देखील पाठवण्याची संधी या माध्यमातून मिळाली आहे. रेल्वेने आत्ता मालवाहतूक वाढवण्यावर अधिक भर दिला आहे. कृषी माल रेल्वे डब्यांमध्ये चढवण्यापासून तो माल उतरवण्यापर्यंत पाठपुरावा केला जात आहे.

 

ज्यामुळे मालवाहतूक अधिक वेगाने आणि सुरक्षितपणे ही वाहतुक होत आहे. त्यातच नव्यानेच गठीत केलेल्या बिजनेस डेव्हलपमेंट युनिट (बीडीयु) चे अधिकारी विविध क्षेत्रातील व्यापारी, उद्योजक, शेतकरी यांच्या भेटी घेवून त्यांना रेल्वेने माल वाहतूक केल्यास त्यांचा माल वेगाने, सुरक्षित आणि कमी खर्चात कसा पोहोचवला जाईल याचे महत्व पटवून देत आहेत. दक्षिण – मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन माल्या यांनी नांदेड विभागातील अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी मालवाहतूक वाढवण्याकरिता करत असलेल्या प्रयत्नाबद्दल त्यांचे स्वागत केले.

माल्या यांनी शेतकरी, व्यापारी आणि उद्योजक यांनी रेल्वे तर्फे दिल्या जाणाऱ्या विशेष सवलती, संधी आणि सुविधांचा उपयोग करुन स्वत:चा व्यवसाय, व्यापार वाढवण्याचे आवाहन देखील या वेळी केले. नांदेड विभागातून पर्यायाने दक्षिण मध्य रेल्वे मध्ये मालवाहतूक वाढवण्यात हातभार लावावा असे सांगितले आहे. कोराना तसेच लॉकडाऊनच्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या सोयाबीन या उत्पादीत मालाला वाहतुकीचा खुप चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे.

English Summary: Soybean seeds from Parbhani sent to Gujarat by train
Published on: 18 March 2021, 04:23 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)