News

Soybean Production : उत्पादन खर्चात जर कुटुंबातील एकाच व्यक्तीची मजुरी मनरेगानुसार (282 रुपये मजुरी) पकडली असता 282 × 120 (चार महिने) = 33840 रुपये मजुरीचे होतात. यात निव्वळ उत्पादन खर्च 25000 मिळवला असता 58480 रुपये हा एकरी गुंतवणूक होते. दीडपट भाव नाही दिला तरीही शेतकऱ्यांच्या कुटुंबाची गुंतवणूक वापस मिळावी असे गृहीत धरले तरीही सद्यस्थिती सोयाबीनला 14620 रुपये प्रती क्विंटल भाव असणे आवश्यक आहे.

Updated on 05 January, 2024 5:12 PM IST

डॉ. सोमिनाथ घोळवे

सोयाबीनला रास्त भाव मिळेल या आशेने जवळपास 60 ते 65 टक्के शेतकऱ्यांनी सोयाबीन घरात साठवण-बचत करून ठेवलेले आहे. (गेल्या वर्षीचे सोयाबीन अनेक शेतकऱ्यांकडे तसेच साठवण करून आहे.) सोयाबीनला किती भाव मिळणे अपेक्षित आहे. अनेकदा म्हटलं जातं की जास्तीचा नको. पण उत्पादन खर्चाच्या दीडपट मिळायला हवा. हा दीडपट भाव मिळणे रास्त-योग्य आहे, असे स्वामिनाथन समिती आणि काही अभ्यासकांनी म्हटले आहे. पण हा भाव मिळतो का?. एमएसपी समितीने सोयाबीनचा भाव हा दीडपट असल्याचे सांगण्यात येते. मात्र एमएसपी (हमीभाव) समितीने चुकीची पद्धतीने मूल्यमापन करून दीडपट भाव काढलेला आहे हे निश्चित. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरेतून हा रास्त भाव नाही. हमीभाव ही अत्यल्प आहे.

सोयाबीन लागवडीपूर्वीच्या मशागतीपासून ते बाजारात जाण्यापर्यंत गुंतवणूकीचा (खर्चाचा) विचार करता, सरासरी 25 हजार रुपये एकरी खर्च येतो. (या खर्चामध्ये कुटूंबातील दोन माणसांची मजुरी पकडलेली नाही.) तर सरासरी उत्पादन किती मिळते? चांगला पाऊस झाला तर 5 ते 6 क्विंटल. पाऊस कमी झाला, पाऊसाने खंड दिला तर 3 ते 4 क्विंटल उत्पादन होते. त्यामुळे सरासरी 4 क्विंटल उत्पादन मिळते असे मिळते. (अतिवृष्टी, दुष्काळ, रोगराई, पाऊसाने खंड देणे, जमिनीतील वाढती नापिकी, हवामान बदल, ऊन, वारा, उंदीर-गुस व इतर संकटे आहेत. त्यामुळे उत्पादन घसरण होते. काढणीवेळी नासाडी मोठी असते. त्यामुळे 4 क्विंटल ही सरासरी उत्पादन होते.)

त्यामुळे उत्पादन खर्चाच्या-गुंतवणूकीच्या दीडपट हा भाव पकडला तर 9375 ते 9500 रुपये भाव असणे आवश्यकच आहे. (25000+12500=37500/4 =9375 रुपये सरसरी प्रती क्विंटल) सद्यस्थितीत 4500 ते 4700 रुपये भाव चालू आहे. अर्थात 4675 ते 4800 रुपये प्रती क्विंटलमागे भाव कमी मिळत आहे. अर्थात सोयाबीनला जो भाव मिळत आहे, त्या किंमतीच्या अर्धीच किंमत मिळत आहे.

दुसरे, उत्पादन खर्चात जर कुटुंबातील एकाच व्यक्तीची मजुरी मनरेगानुसार (282 रुपये मजुरी) पकडली असता 282 × 120 (चार महिने) = 33840 रुपये मजुरीचे होतात. यात निव्वळ उत्पादन खर्च 25000 मिळवला असता 58480 रुपये हा एकरी गुंतवणूक होते. दीडपट भाव नाही दिला तरीही शेतकऱ्यांच्या कुटुंबाची गुंतवणूक वापस मिळावी असे गृहीत धरले तरीही सद्यस्थिती सोयाबीनला 14620 रुपये प्रती क्विंटल भाव असणे आवश्यक आहे. जर सरासरी उत्पादन 5 क्विंटल पकडले तरीही 11696 रुपये प्रती क्विंटल भाव मिळायला हवा आहे. (उत्पादन खर्च 25000 + शेतकऱ्यांची 120 दिवसांची मजुरी 33830 रुपये= 58480 रुपये उत्पादन खर्च आहे.)

शेतमालाचे भाव कमी का आहेत. तर शेतमालच्या संदर्भातील राबवण्यात येत आलेले धोरण हे कारणीभूत आहे. शेतकरी केंद्रित धोरण राबवणे आवश्यक आहे. मात्र धोरण हे मध्यमवर्ग, उद्योजक, भांडवलदार, प्रकिया उद्योग केंद्रित आहे. दुसरे, शेतमालाला उत्पादन खर्चाच्या तुलनेत दीडपट भाव देण्यात येत आहे असे कोण म्हणत असेल तर ती पूर्णपणे धूळफेक आहे. फसवेगिरी आहे. दीडपट भाव देत आहोत असे म्हणणारे लोक हे शेतकऱ्यांच्या बाजूचा नसून ते भांडवलदार, उद्योजक, व्यापारी वर्गाचा दलाल, मध्यस्थी, यांच्या बाजूने आहेत. शेतकऱ्यांची दिशाभूल करून लूट करण्यासाठी सोडलेले आहेत हे मात्र निश्चित.
टीप: अल्पभूधारक शेतकरी हळूहळू सोयाबीन विकू लागले आहेत. मात्र रास्त भाव मिळत नाही म्हणून खूप नाराजी आहे.

(लेखक शेती , दुष्काळ , ऊसतोड मजुर प्रश्नांचे अभ्यासक असून 'द युनिक फाऊंडेशन, पुणे' येथे वरिष्ठ संशोधक आहेत.)
ई-मेल - sominath.gholwe@gmail.com

English Summary: Soybean Rate Is the price of soybeans one and a half times the cost of production
Published on: 05 January 2024, 05:12 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)