देशामध्ये शेतीनंतर वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मीती उपलब्ध असल्याने केंद्र सरकारने वस्त्रोद्योग व्यवसायाला नवसंजीवनी देणारे लवकरच नवीन धोरण जाहीर करणार असल्याची माहिती केंद्रीय वस्त्रोद्योग व वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिली. वस्त्रोद्योग धोरण, सोयाबीन आयात- निर्यात धोरण व साखरेचा बाजारभाव ३८ रूपये स्थिर करण्याच्या मागणीसाठी दिल्ली येथे कृषीभवनातील अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयात मंत्री गोयल यांची भेट घेतली.
देशातील वस्त्रोद्योग व्यवसायाशी निगडीत अनुदान केंद्र सरकारने बंद केल्याने हा व्यवसाय मोठ्या संकटात सापडला आहे. वाढलेल्या महागाईमुळे, कच्चा मालातील चढ उतार, वीजेचे वाढलेले दर यामुळे व्यवसायात मंदीचे सावट निर्माण झालेले आहे.
तसेच सुत दरातील दैनंदिन होणाऱ्या चढ उतारात सरकारने यार्न बॅंकेच्या संकल्पनेतून नियंत्रण करण्याची गरज असल्याची मागणी केली. याबरोबरच केंद्र सरकारने अदानी यांच्या कंपन्यांना पामतेल आयात करण्यास परवानगी दिल्याने देशातील सोयाबीनचे दर कोसळू लागले आहेत.
देशात गेल्या 10 दिवसांपासून मान्सून ठप्प, पावसाची परिस्थिती चिंताजनक..
यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणार आहे. याकरिता केंद्र सरकारने पामतेल आयातीवर तातडीने आयात शुल्क वाढविण्याची मागणी केली. तसेच खतांच्या किंमतीमध्ये भरमसाठ वाढ होत आहेत. यामुळे शेतक-यांचा उत्पादन खर्च कोलमडत असून खतांचे दर स्थिर राहण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत.
तसेच केंद्र सरकारच्या इथेनॅाल धोरणामुळे साखर उद्योग जरी स्थिरावला असला तरी उस उत्पादनात ३० टक्क्यांनी महागाई वाढलेली असून केंद्र सरकारने मात्र एफ.आर.पी मध्ये ३ टक्क्यांनी वाढ केल्याने देशातील शेतक-यांना यंदा एफ.आर. पी पेक्षा जादा दर शेतक-यांना मिळण्यासाठी बाजारातील साखरेचा दर किमान ३८ रूपये स्थिर करण्याची मागणी केली.
मशरूमची लागवड कशी केली जाते, शेतकऱ्यांना लाखोंचा नफा मिळेल, जाणून घ्या..
तसेच गु-हाळघरांचे क्लस्टर करून त्यांना इथेनॅाल करण्यास परवानगी दिल्यास बाजारांमध्ये गुळाचे दर नियंत्रणात राहून चांगला दर मिळेल. महाराष्ट्रात सोयाबिनची खरेदी एमएसपी च्या कमी किंमतीत सुरू आहे.
अनेक व्यापा-यांनी ४५०० रूपये खरेदी करत आहेत. सरकारने यामध्ये तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली. यावेळी मंत्री गोयल यांनी नवीन वस्त्रोद्योग धोरणाबरोबर सोयाबीनचे दर किमान ७००० रूपयावर स्थिर राहण्यासाठी सरकार प्रयत्नशिल असल्याचे त्यांनी सांगितले. एमएसपी नुसारच सोयाबिनची खरेदी करण्यासाठी योग्य ते निर्देश संबंधित अधिका-यांना यावेळी देण्यात आले.
कर्तृत्वाचा सन्मान! महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा यांना प्रदान
Published on: 21 August 2023, 01:26 IST