कोरोनामुळे परदेशी बाजारामध्ये मंदी असून सुद्धा देशात येईल या काळामध्ये मागणीची वाढ कायम राहिली असल्यामुळे सोयाबीन तेलबियांच्या किमती मध्ये बुधवारी बाजारात वाढ झालेली दिसून येत आहे जे की आवक कमी असल्याने आणि मागणी जास्त असल्यामुळे सोयाबीन तेलबिया च्या किमतीमध्ये चांगली वाढ झालेली आहे. मंडई मध्ये सोयाबीन ची आवक कमी आहे पण जे स्थानिक लोक आहेत त्यांची मागणी लक्षात घेऊन मोहरीच्या तेलबिया तसेच सिपीओ व पामोलीन च्या तेलबिया किमतीमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येत आहे.
तसेच ज्या अन्य तेलबियांचे तेल आहे त्याच्या किंमती सर्वसाधारण असल्याचे समजत आहे तरी काही तेलबिया च्या किमती मध्ये ढासळन झालेली आहे.शिकागो एक्सचेंज एक टक्याने खाली आहे तसेच मलेशिया एक्सचेंज तर बंदच आहे असे व्यापार वर्गाने सांगितले आहे. स्थानिक लोकांची मागणी वाढत चालली आहे पण बाजारामध्ये सोयाबीन व मोहरीची आवक खूपच कमी प्रमाणात झालेली आहे त्यामुळे सोयाबीन तेलबियांच्या किमती मध्ये फारच विक्रमी सुधारणा झालेली आहे आणि त्याचा परिणाम दुसऱ्या तेलबीयांवर झालेला दिसून येत आहे.
सोयाबीनची किमंत प्रति क्विंटल ८७०० रुपये:
सोयाबीन च्या किमतीमध्ये वाढ झालेले प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे महाराष्ट्र राज्यामधील लातूर शहर. लातूर शहरात सोयाबीन बियाणे प्लांट डिलिव्हरी चा भाव ८४५० वरून डायरेक्ट ८६५० रुपये प्रति क्विंटल वर गेलेला आहे. या किमतीमध्ये जीएसटी तसेच वस्तू व सेवा कर सुद्धा आकारण्यात आलेला आहे.महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यामधील शेतकऱ्यांनी सोयबिनची लागवड करण्यासाठी प्रति क्विंटल ८७०० रुपये किमतीने सोयाबीन खरेदी केले आहे.
केंद्र सरकारने खाद्य तेलाच्या आयाती किंमती कमी करण्याऐवजी तेल बियानाचे उत्पन्न वाढविण्यावर भर दिला पाहिजे ज्यामुळे परदेशी बाजाराचा आपल्याला आवलंब कमी होऊ शकेल. पामोलीन तेलाच्या आयातीवर आळा घालणे व्यापाऱ्यांनी केले पाहिजे नाहीतर आपण जे घरगुती तेल वापरतो त्या तेलाचे शुद्धीकरणं करण्यासाठी ज्या कंपन्या काम करत आहेत त्या कंपन्या बंद पडण्यास जास्त दिवस लागणार नाहीत असे म्हणले गेले आहे.
Published on: 25 July 2021, 07:39 IST