बाजारपेठेत आवक वाढल्याने सोयाबीनच्या दरात फार मोठी घसरण झाली. त्यावेळी मात्र मग सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी बाजारपेठेतील गणित समजून घेत सोयाबीनच्या साठवणुकीवर आपले सर्व लक्ष केंद्रित केले. शेतकऱ्यांच्या या निर्णयामुळे बाजारपेठेत सोयाबीनचा जणू तुटवडा निर्माण झाला, बाजारपेठेत सोयाबीनचा तुटवडा निर्माण झाल्याने सोयाबीनचे दर पुन्हा एकदा वाढले आणि त्यानंतर सोयाबीनचे दर कायम स्थिर राहिले. अकोला एपीएमसी मध्ये सध्या सोयाबीनच्या दरात वाढ झाली आहे, दोन तारखेला अर्थातच बुधवारी सोयाबीनला आठ हजार रुपये प्रति क्विंटल एवढा विक्रमी बाजारभाव प्राप्त झाला. गत आठवड्यात मिळत असलेल्या दरापेक्षा सध्या सोयाबीनच्या दरात एक हजार रुपयाची घसघशीत वाढ नमूद करण्यात आली आहे. हंगामाच्या अंतिम टप्प्यात सोयाबीनच्या दरात वाढ झाल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी सुखावले असल्याचे चित्र बघायला मिळत आहे तसेच बाजारपेठेत सोयाबीनची आवक देखील कमालीची वाढली आहे. बुधवारी अकोला एपीएमसी मध्ये जवळपास दोन हजार क्विंटल सोयाबीनची आवक नमूद करण्यात आली.
गेल्या आठवड्यात सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळत होता. हा दर संपूर्ण आठवडा बघायला मिळाला, मात्र युक्रेनमध्ये सुरू असलेल्या रशिया आणि युक्रेन युद्धाच्या परिणामामुळे जागतिक बाजारपेठेत सोयाबीनची मंदी बघायला मिळत आहे, त्यामुळे सोयाबीनच्या दरात वाढ झाली असल्याचे तज्ज्ञांद्वारे सांगितले जात आहे. अकोला एपीएमसी मध्ये जरी आठ हजार रुपये प्रति क्विंटल एवढा सोयाबीनला दर मिळत असला तरी देखील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अजूनही दरात वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन ची साठवणूक करून ठेवली असल्याचे सांगितले जात आहे. तसेच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी तज्ञांनी एक आनंदाची बातमी सांगितली, तज्ञांच्या मते जर युद्धाचा कालावधी अजून वाढला तर सोयाबीनचा जागतिक बाजारपेठेत मोठा तुटवडा भासेल आणि परिणामी आगामी काही दिवसात सोयाबीनचे भाव वाढण्याची शक्यता आहे.
रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगातील अनेक देशांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. भारत देखील या युद्धाचा शेवट शांततेने व्हावा हीच आशा बाळगत आहे, मात्र या युद्धामुळे भारतातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आनंदाचे भरते आले आहे एवढं नक्की. कारण की या युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत सोयाबीनची उणीव भासत आहे आणि म्हणूनच चार दिवसांपासून सोयाबीनच्या दरात रोजना वाढ होत आहे. ज्या पद्धतीने सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे, त्या पद्धतीनेच सोयाबीनच्या आवक मध्ये देखील वाढ नमूद करण्यात आली आहे. यामुळेच की काय गत चार दिवसात अकोला एपीएमसी मध्ये सुमारे दहा हजार क्विंटल सोयाबीनची आवक झाली असल्याचे बाजार समितीद्वारे सांगितले गेले.
Published on: 03 March 2022, 03:43 IST