मागील चार दिवसांपासून सोयाबीनच्या दरामध्ये वाढ होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे. उत्पादनात घट झाली असली तरी वाढत्या दरामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दिवाळी नंतर मार्केट मध्ये मोठा बदल झालेला आहे. मागील चार दिवसांपासून लातूर मधील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीन दरात ६०० रुपयांनी वाढ झालेली आहे.सोयाबीन दरात एवढा बदल होईल अशी अपेक्षा शेतकरी काय व्यापारी वर्गाला सुदधा न्हवती. परंतु आवक जास्त नसल्याने दर टिकून राहिले आहेत. लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मराठवाडा मधील उस्मानाबाद, नांदेड, बीड, अंबाजोगाई भागातून सोयाबीन ची आवक होते.
सोयाबीन चे वाढले दर:-
दिवाळी च्या आधी सोयाबीन च्या दरात मोठ्या प्रमाणात घट झाली होती त्यामुळे भविष्यात दर घटत जातील असा अंदाज होता मात्र अचानक उद्योजकांची मागणी वाढली असल्याने दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मागील चार दिवसात ६०० रुपयांनी दरात वाढ झालेली आहे तसेच दुसऱ्या बाजूस आवक कमी होत असल्याने दर वाढल्याचा अंदाज व्यक्त झालेला आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन ची साठवणूक करून ठेवली आहे आणि हा अंदाज खरा ठरला असून सोयाबीन ला भाव मिळालेला आहे.
उडदाचे दर मात्र स्थिरच:-
खरीप हंगामाच्या सुरुवातीला उडीद चे दर स्थिर होते जे की आजच्या स्थितीला सुद्धा लातूरच्या बाजार समितीमध्ये उडदाचा दर प्रति क्विंटल ७२५० आहे. यंदाच्या हंगामात उडदाने शेतकऱ्यांना साथ दिली आहे. सध्या उडदाची आवक वाढेल असा अंदाज तेथील व्यपाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
इतर शेतीमालाचे कसे आहेत दर:-
गुरुवारी लाल तूर- 5831 रुपये क्विंटल, पांढरी तूर 5800 रुपये क्विंटल, पिंकू तूर 5675 रुपये क्विंटल, जानकी चना 4900 रुपये क्विंटल, विजय चणा 4900, चना मिल 4750, सोयाबीन 6210, चमकी मूग 7400, मिल मूग 6250 तर उडीदाचा दर 7250 रुपये होता.
Published on: 19 November 2021, 06:47 IST