सध्या राज्यात खरीप हंगामातील सोयाबीन अंतिम टप्प्यात आला आहे आणि हंगामाच्या अंतिम टप्प्यात सोयाबीनच्या दराबाबत बाजारपेठेत मोठा उलटफेर बघायला मिळत आहे. तीन महिन्यांपूर्वी राज्यात सर्वत्र सोयाबीनची काढणी पूर्ण झाली होती आणि तेव्हापासून सोयाबीन बाजारात विक्री करण्यासाठी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची लगबग नजरेस पडत होती. हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीनला उच्चांकी दर मिळाला होता, सुरुवातीला सोयाबीनला अनेक जिल्ह्यात विक्रमी दहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव प्राप्त झाला होता. मध्यंतरी सरकारच्या सोयाबीन आयातीच्या मंजुरीमुळे सोयाबीनचे दर लुडकले होते, मात्र सोयाबीनचे बाजार भाव कमी होताच सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सावध पवित्रा अंगीकारत सोयाबीनच्या साठवणूकी कडे लक्ष केंद्रित केले, त्यामुळे पुन्हा सोयाबीनच्या बाजार भावात तेजी नमूद करण्यात आली. मात्र आता हंगाम अंतिम टप्प्यात आले असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकर्याची भूमिका पूर्णतः बदलली आहे.
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना या हंगामात अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली असल्याचे ज्ञात होते, म्हणून बाजारपेठेत सुरवातीला सोयाबीनला कमी बाजार भाव भेटला की लागलीच सोयाबीनची साठवणूक सुरू करायचे आणि जेव्हा सोयाबीनचे दर गगनभरारी घेऊ लागले तेव्हा सोयाबीनची विक्री करायचे. मात्र आता हंगाम अंतिम टप्प्यात आला असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या पूर्वीच्या भूमिकेत बदल घडवून आणत कमी बाजार भाव भेटत असतांना देखील सोयाबीनची विक्री सुरूच ठेवली आहे. मराठवाड्यातील लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या सोयाबीनची विक्रमी आवक नमूद करण्यात येत आहे, त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची बदललेली भूमिका प्रकर्षाने जाणवत आहे. यंदाच्या खरीप हंगामात दीर्घकाळ पावसाने हजेरी लावली त्याचा परिणाम खरीप हंगामातील सर्वच पिकांवर झाला तसेच यामुळे रब्बी हंगामातील पेरण्या देखील लांबणीवर पडल्या. रब्बी हंगामातील पेरा लांबल्यामुळे अनेक जिल्ह्यात ज्वारी पिकासाठी पोषक वातावरण नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात सोयाबीन पेरणीसाठी पसंती दर्शवली. त्यामुळे रब्बी हंगामात सोयाबीनचा पेरा वाढला आहे.
उन्हाळी हंगामात मोठ्या प्रमाणात सोयाबीन लागवड केली गेली असल्याने आगामी काही दिवसात मोठ्या प्रमाणात उन्हाळी सोयाबीन बाजारपेठेत हजेरी लावणार आहे. सध्या रब्बी हंगामातील सोयाबीनमध्ये चांगल्या पद्धतीने फळधारणा झाली आहे आणि सोयाबीनच्या शेंगा आत्ता चांगल्या बहरत आहेत. त्यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन हंगामाच्या अंतिम टप्प्यात साठवणूक करणे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना धोक्याचे ठरू शकते. आगामी काही दिवसात मोठ्या प्रमाणात उन्हाळी सोयाबीनची आवक बाजारपेठेत दाखल झाल्यावर साठवणूक केलेल्या सोयाबीनला मागणी कमी होईल? त्यामुळे सध्या बाजारपेठेत जरी सरासरी दर सोयाबीनला प्राप्त होत असला तरी सोयाबीन उत्पादक शेतकरी सोयाबीनची साठवणूक करण्यापेक्षा विक्री करण्यावरच भर देताना दिसत आहेत. जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला सोयाबीनला 6 हजार 600 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळत होता आता या बाजार भावात जवळपास पाचशे रुपयाची घसरण नमूद करण्यात आले आहे
आता सोयाबीन लाख 6 हजार 100 रुपये प्रतिक्विंटल एवढाच बाजार भाव मिळत आहे. तरीदेखील सोयाबीनची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे, कारण जर उद्या उन्हाळी सोयाबीनची आवक वाढली तर साठवणूक केलेल्या सोयाबीनला मागणी राहणार नाही या अनुषंगाने सध्या लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 22 हजार पोत्यांची आवक होत आहे. लातूर प्रमाणेच राज्यातील इतर कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये देखील सोयाबीनची विक्रमी आवक नमूद करण्यात येत आहे.
Published on: 28 January 2022, 08:45 IST