News

सोयाबीनच्या निकृष्ट बियाणांचा पुरवठा केल्यावरुन कृषी आयुक्त कार्यालायने राज्यातील ११ बियाणे कंपन्यांचा विक्री परवाना कायमचा रद्द करण्यात आला आहे. राज्यात १ लाख ६० हजार शेतकऱ्यांनी बियाणांबाबत तक्रार केली होती.

Updated on 28 September, 2020 5:58 PM IST


सोयाबीनच्या निकृष्ट बियाणांचा पुरवठा केल्यावरुन कृषी आयुक्त कार्यालायने राज्यातील ११ बियाणे कंपन्यांचा विक्री परवाना कायमचा रद्द करण्यात आला आहे. राज्यात १ लाख ६० हजार शेतकऱ्यांनी बियाणांबाबत तक्रार केली होती. ७७ तक्रारीच्या सुनावणीनंतर ही कारवाई झाली असून अजून ४१ तक्रारींची सुनावणी लवकर केली जाणार आहे. याविषयीची माहिती कृषी आयुक्त धीरजकुमार यांनी दिली आहे.

खरीप हंगामासाठी कंपन्यांनी शेतकऱ्यांना या बियाणांचा पुरवठा केला होता. त्याची उगवणच झाली नाही. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या. त्याची दखल घेत कृषी आयुक्त कार्यालयाच्या गुणवत्ता नियंत्रण पथकाने बियाणांची तपासणी केली. त्यात बियाणांमध्ये कमतरता आढळली, त्यामुळे तक्रारदार शेतकऱ्यांच्या शेतातील बियाणांचा पंचनामा करुन त्या कंपन्यांच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात येत आहे. निकृष्ट बियाणांमुळे राज्यातील सोयाबीनच्या ४३ लाख हेक्टरपैकी २० टक्के क्षेत्र बाधित राहणार आहे. नांदेड, परभणी, हिंगोली, औरंगाबाद, अहमदनगर जिल्हे तसेच अन्य मोठ्या विभागांमधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना निकृष्ट बियाणांचा फटका बसला आहे. दरम्यान नाशिक विभागात कृषी विभागाकडे एकूण ४९४ तक्रारी आल्या. त्यापैकी नाशिकमध्ये सर्वाधिकत २७२ तक्ररी होत्या.

English Summary: Soybean Inferior Seed - License of 11 companies permanently revoked
Published on: 28 September 2020, 05:58 IST