News

या वर्षी खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीन आणि कापूस यांच्या प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे उत्पादनात घट आल्याने या वर्षी सोयाबीन आणि कापसाचे बाजार भाव बऱ्यापैकी टिकून आहेत.

Updated on 15 February, 2022 5:07 PM IST

या वर्षी खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेल्या सोयाबीन आणि कापूस यांच्या प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे उत्पादनात घट आल्याने या वर्षी सोयाबीन आणि कापसाचे बाजार भाव बऱ्यापैकी टिकून आहेत.

यामध्ये सोयाबीनच्या बाजारभावाचा विचार केला तर यामध्ये सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहे. यावर्षी शेतकऱ्यांनी देखील बाजारपेठेचा अभ्यास करूनच सोयाबीनची आवक सुरू ठेवले.  त्यामुळे सोयाबीनचे बाजार भाव बऱ्यापैकी टिकून राहिले. जर आंतरराष्ट्रीय स्थितीचा विचार केला तर सोयाबीनचा प्रमुख उत्पादक देश म्हणूनब्राझीलला ओळखले जाते. येथेसुद्धा सोयाबीनच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन तेजीत आहे. भविष्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सहज देशातही दर सुधारण्याची शक्यता आहे असं जाणकारांनी सांगितले.

 सोयाबीनच्या जागतिक बाजाराची स्थिती

 2022मध्ये सोयाबीन तेजीत राहण्याची शक्यता आहे असे जागतिक बँक आणि यूएसडी एचेमत आहे. जर या संस्थांची माहितीचा आधार घेतला तर 2021 मध्ये सोयाबीनचे दर 43  टक्क्यांनी वाढून 583 डॉलरवर पोहोचले होते. यामध्ये चालू वर्षात 1 टक्क्यांनी वाढ होऊन ते 588 डॉलर वर राहण्याची शक्यता आहे.

वातावरणाचा फटका बसून अनेक सोयाबीन उत्पादक देशांमध्ये सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्‍यता आहे. ब्राझील, अर्जेंटिना, चीन,कॅनडा, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम तसेच दक्षिण आफ्रिका या देशांमध्ये उत्पादन कमी आल्या असल्यामुळे 2022 मध्ये जागतिक सोयाबीन उत्पादन 0.6 टक्क्यांनी घटून 3640 लाख टनांवर स्थिरावेल अशी शक्यता आहे. ब्राझील हा एक प्रमुख सोयाबीन उत्पादक देश असून तेथे सोयाबीनचे काढणी क्षेत्र चार टक्‍क्‍यांनी वाढले आहे. परंतु तरीसुद्धा उत्पादकता घटल्याने यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन टक्‍क्‍यांनी उत्पादन कमी होण्याचा अंदाज आहे. जर जागतिक पातळीवर 2020मध्ये चा सोयाबीन निर्यातीचा विचार केला तर ती 1हजार सातशे तीस लाख टन होती. या निर्यातीमध्ये एकट्या ब्राझीलचा वाटा 830 लाख टन होता. तर अमेरिकेचा सहाशे पन्नास लाख टन वाटा होता.जर या दोन्ही देशांचा विचार केला तर जागतिक निर्यातीत यांचा वाटा 85 टक्के आहे. 

अर्जेंटिनाचा 64 लाख टन तर कॅनडा 44 लाख टन सोयाबीन निर्यात 2020 मध्ये झाली होती. यंदा सोयाबीन निर्यात करणाऱ्या अनेक देशात उत्पादन घटणार आहे व त्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय बाजारावर उमटत आहेत. मार्च महिन्यातील वायदे 1599 सेंटर प्रति पाउंडने झाले. दलियन एक्सचेंजवर सोयाबीनचे वायदे 6301 युआन प्रति टन झाले. या सगळ्या परिस्थितीमुळे बाजारात सोयाबीनचे दर सुधारली असून सध्या बाजारामध्ये सोयाबीनला सोयाबीनला सहा हजार दोनशे ते सहा हजार 500 रुपये दर मिळत आहे.

English Summary: soyabioen rate increase in 2022 due to that international market and supply situation
Published on: 15 February 2022, 05:07 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)