News

मागील बऱ्याच दिवसांपासून सोयाबीनचे दर स्थिर असून त्यांचा कोणत्याही प्रकारचा परिणाम आवकेवर झाला नव्हता. परंतु आता दर घटकास त्याचा सर्व बाजूंनी परिणाम पाहायला मिळत आहे. भाव वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सोयाबीनचा साठा करून ठेवला होता.

Updated on 26 January, 2022 6:15 PM IST

मागील बऱ्याच दिवसांपासून सोयाबीनचे दर स्थिर असून त्यांचा कोणत्याही प्रकारचा परिणाम आवकेवर झाला नव्हता. परंतु आता दर घटकास त्याचा सर्व बाजूंनी परिणाम पाहायला मिळत आहे. भाव वाढतील या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सोयाबीनचा साठा करून ठेवला होता.

अपेक्षेने  दिवाळीनंतर सोयाबीनच्या भावात वाढ देखील झाली. परंतु शेतकऱ्यांच्या अपेक्षा ही नऊ हजाराचे होती. आता अंतिम टप्प्यातील सोयाबीन सुरू असून असे असताना देखील जानेवारी महिन्यात ज्या प्रमाणात दर वाढले होते तेदर टिकून राहिले नाहीत. गेल्या महिनाभर मध्ये 6600 वर गेलेले सोयाबीनचे भाव आता सहा हजार 100 वर येऊन थांबले आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी सोयाबीनचे दर हे कमी पण स्थिर होते असे असताना देखील लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बावीस हजार पोत्यांची आवक सुरू होती.

मात्र भावात दोनशे रुपयांची घट झाल्याने त्याचा परिणाम हा आवके वर  झाला आहे. मंगळवारी चक्क लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ पंधरा हजार पोत्यांची आवक झाली होती.

 बाजारपेठेतील वास्तव

 या वर्षी पावसामुळे सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली असली तरी सोयाबीनच्या प्रत नुसार दर मिळाले आहेत. परंतु या दरम्यान शेतकऱ्यांनी घेतलेली भूमिका ही वेळोवेळी निर्णायक ठरलेली आहे.जेव्हा सोयाबीनचे दर कमी झाले होते तेव्हा शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्री करण्यापेक्षा त्याच्या साठवणुकीवर भर दिला होता.परंतु शेतकऱ्यांना असलेल्या अपेक्षित दरासाठी प्रतीक्षा करावी लागली आहे. 

सध्या बाजारपेठेतील चित्र बदलत असून शेतकऱ्यांकडे असलेल्या सोयाबीनहे सर्वात्तम दर्जाचे नाही. शिवाय मागणीत वाढ नसल्यानेएकतर दर स्थिर आहेत किंवा त्यामध्ये घट होत आहे. त्यामुळे हंगामाच्या अंतिम टप्प्यात शेतकऱ्यांना अडचणीत यायचे नसेल तर दराचा विचार न करता टप्प्याटप्प्याने विक्री करण्यास फायद्याची राहणार असल्याचे कृषी तज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे.(स्त्रोत-कृषिक्रान्ति)

English Summary: soyabioen rate in market decrease so fall effect on incoming on soyabioen
Published on: 26 January 2022, 06:15 IST