सध्या रशिया आणि युक्रेन मध्ये घमासान युद्ध सुरू आहे.त्याचा सरळ सरळ परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठांवर होत आहे. आज रशिया आणि युक्रेन युद्धाचा नववा दिवस आहे. या युद्धाचा अनेक प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव वर परिणाम होत आहे
या युद्धामुळे पाम तेलाच्या आयातीवर परिणाम झाला असून सोयाबीनला मागणी वाढली आहे. जर सोयाबीन बाजार भावचा मागच्या काही दिवसांचा विचार केला तर दिवाळीनंतर सोयाबीनचे भाव घसरले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीस न आणता त्याची साठवणूक करण्यावर भर दिला होता. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून टप्प्याटप्प्याने सोयाबीनच्या बाजार भावात वाढ होत जाऊन ते साडेपाच हजाराहून सहा हजारापर्यंत झाली.तरीसुद्धा भाव वाढीचे अपेक्षा असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवणूक वरच भर दिला.यामध्ये जाता रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध सुरू झाल्याने त्याचा थेट परिणाम हा पाम तेल आयातीवर होऊन खाद्य तेलाच्या भावात दहा रुपयांनी वाढ झाली.
येणाऱ्या दिवसात खाद्यतेलाचे भाव अजून वाढतील अशी शक्यता आहे. या सगळ्या परिस्थितीत व्यापाऱ्यांचा सोयाबीन खरेदीकडे कल वाढला असून बाजारात सतत सोयाबीनचे दर वाढत आहेत. बुधवारी सोयाबीनचे दर हे साडेसात ते सात हजार 800 रुपयांपर्यंत होते. रशिया आणि युक्रेन या दोन देशातील युद्ध अजून काही काळ चालले तर गोड तेलाचे भाव भडकण्याची शक्यता असून त्यामुळे सोयाबीनच्या बाजार भावात येत्या काळात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे व्यापारी चढ्या दराने सोयाबीनची मागणी करीत असून भावा चढ-उतार होताना दिसत आहे..
तुरीच्या बाजार भाव आज देखील क्विंटलमागे 50 रुपयांची वाढ झाली असून हरभरा, उडीद मूग व तीळ याचे भाव मात्र स्थिर आहेत. जर आपण 21 डिसेंबर आणि दोन मार्च 2022 पर्यंतचा सोयाबीनचे बाजार भाव चा आलेख पाहिला तर 21 डिसेंबर 2021 रोजी सोयाबीनचा भाव पाच हजार 740 रुपये प्रतिक्विंटल होता तर दोन मार्च 2022 रोजी सात हजार 800 रुपये सोयाबीनचा बाजार भाव होता.
Published on: 04 March 2022, 09:42 IST