सध्या लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत (Latur Agricultural Produce Market Committee) सोयाबीनच्या दरात मामुली बढत नमूद करण्यात येत आहे, यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे चित्र बाजारपेठेत उभे राहिले आहे. गेल्या दीड महिन्यापासून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी (Soybean growers) अत्यल्प बाजार भाव मिळत असल्याने भाववाढीच्या आशेने सोयाबीनची साठवणूक करण्याचा निर्णय घेतला. अनेक शेतकऱ्यांनी (By farmers) सोयाबीनची साठवणूक करून ठेवली मात्र दीड महिन्यापासून सोयाबीनच्या दरात घसरण झाली आणि सोयाबीनचे दर सहा हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास येऊन स्थिर झालेत. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सोयाबीन साठवणूक करून मोठी चूक केल्याचे वाटत होते. परंतु आता हंगाम अंतिम टप्प्यात आला असताना लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीनच्या दरात थोडी का होईना वाढ झाली असल्याने साठवणुकीचा निर्णय योग्य असल्याचा शेतकऱ्यांना खात्री पटली. सध्या लातूरच्या (Latur) बाजारपेठेत सोयाबीनला 6300 रुपये प्रतिक्विंटल असा बाजार भाव मिळत आहे.
सोयाबीनला मिळत असलेला हा बाजार भाव अपेक्षसारखा नसला तरीदेखील समाधान कारक असल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती तयार झालेले चित्र सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना विक्री करण्यासाठी भाग पाडू शकते आणि त्यामुळे आगामी काही दिवसात सोयाबीनची आवक वाढू शकते असा तज्ञांनी अंदाज व्यक्त केला आहे. शुक्रवारी लातूर बाजारपेठेत सहा हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल असा समाधानकारक बाजार भाव प्राप्त झाला यावेळी बाजारपेठेत 18000 पोते सोयाबीनची आवक नमूद करण्यात आली होती. आगामी काही दिवसात वाढलेल्या दरामुळे आवक वाढू शकते. या हंगामात सोयाबीनचे दर ठरवण्यासाठी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा रोल आहे. हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीनला अतिशय अत्यल्प बाजार भाव मिळत होता.
त्यावेळी सोयाबीनला अवघा 4,500 रुपये प्रति क्विंटल एवढाच बाजार भाव मिळत होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवणूक करण्याचा धाडसी निर्णय घेतला. शेतकऱ्यांच्या या निर्णयामुळे मध्यंतरी सोयाबीनचे बाजार भाव 6500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत येऊन पोहोचले. मात्र, गेल्या दीड महिन्यापासून सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतच बाजार भाव मिळत होता. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली होती. दीड महिने सोयाबीनचा बाजारभाव स्थिर असल्याने भविष्यात बाजार भाव वाढतो की नाही याबाबत शेतकऱ्यांच्या मनात संभ्रमावस्था निर्माण झाली.
परंतु आता हंगाम अंतिम टप्प्यात असताना झालेली ही दरवाढ सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना लाभदायी सिद्ध होऊ शकते. तसेच काही तज्ञांनी सोयाबीनच्या दरात अजून थोडीशी वाढ होऊ शकते असा अंदाज वर्तवला असल्याने पुनश्च एकदा सोयाबीनला अच्छे दिन येतील असे सांगितले जात आहे.
Published on: 05 February 2022, 08:34 IST