News

राज्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची खरीप हंगामात लागवड केली जाते. सोयाबीनला खरीप हंगामातील मुख्य पीक म्हणून ओळखले जाते. सोयाबीन उत्पादक शेतकरी या अल्पावधीत काढणीला येणाऱ्या पिकाची लागवड करून चांगला बक्कळ पैसा अर्जित करत असतात. साधारणता सोयाबीन हे खरीप हंगामात लावले जाते, मात्र सांगली जिल्ह्यात अनेक शेतकरी सोयाबीन पिकाला रब्बी हंगामात पेरणी करताना दिसत आहेत.

Updated on 28 January, 2022 5:22 PM IST

राज्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची खरीप हंगामात लागवड केली जाते. सोयाबीनला खरीप हंगामातील मुख्य पीक म्हणून ओळखले जाते. सोयाबीन उत्पादक शेतकरी या अल्पावधीत काढणीला येणाऱ्या पिकाची लागवड करून चांगला बक्कळ पैसा अर्जित करत असतात. साधारणता सोयाबीन हे खरीप हंगामात लावले जाते, मात्र सांगली जिल्ह्यात अनेक शेतकरी सोयाबीन पिकाला रब्बी हंगामात पेरणी करताना दिसत आहेत.

वातावरणात होणारे वारंवार बदल, इतर पिकांची घटती मागणी, अवकाळी पाऊस, देशात सर्वत्र कोरोनाव्हायरस नामक महाभयंकर आजाराचे सावट त्यामुळे इतर भाजीपाला वर्गीय पिकांची घटती मागणी तसेच बाजारपेठ यांचा अभाव, तसेच अल्प कालावधीत सोयाबीन पिकातून मिळणारे फायदे या सर्व बाबींचा विचार करून सांगली जिल्ह्यात अनेक शेतकरी रब्बी हंगामात सोयाबीनचा पेरा करताना नजरेस पडत आहेत. सांगली जिल्ह्यातील कुर्लाप भागात मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन घेतले जाते. सांगली जिल्हा हा ऊस शेतीसाठी विशेष ओळखला जातो, या समवेतच येथील शेतकरी बांधव हरभरा मका गहू हरभरा सूर्यफूल इत्यादी पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड करत आले आहेत. खोडवा ऊस काढणी झाल्यानंतर या परिसरातील अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकांची लागवड करत असतं. भाजीपाला पिकात भोपळा पडवळ कारली काकडी इत्यादी पालेभाज्यांचा शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात लागवड करत. मात्र गेल्या दोन वर्षापासून कोरोना मुळे शेतकरी बांधवांना भाजीपाला विक्रीसाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे भाजीपाला पिकासाठी केला गेलेला उत्पादन खर्च देखील शेतकरी बांधवांना काढणे अशक्य होऊन बसले होते. 

यंदा पुन्हा एकदा सांगली जिल्ह्यातील बळीराजा रब्बी हंगामासाठी सज्ज झाला आहे मात्र यावेळी शेतकरी राजाने आपल्या नियोजनात मोठा अमुलाग्र बदल घडवून आणला आहे. आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकांची लागवड करण्याकडे पाठ फिरवली आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकरी सोयाबीन लागवडीसाठी जमिनीची पूर्वमशागत करताना नजरेस पडत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी जमिनीची पूर्वमशागत आपटली असून आता मोकळ्या जमिनीत सोयाबीनची लागवड करण्यासाठी लगबग करताना दिसत आहेत. जिल्ह्यातील शेतकरी सोयाबीन पिकासमवेतच रब्बी हंगामातील प्रमुख पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गव्हाची देखील मोठ्या प्रमाणात लागवड करताना यावेळी नजरेस पडत आहेत.

जिल्ह्यात शेतकरी बांधवांनी रब्बी हंगामात सोयाबीन ची लागवड केली खरी मात्र आता यापासून मिळणाऱ्या उत्पादनावर पुढील हंगामातील भवितव्य अवलंबून असणार आहे. तसेच शेतकऱ्यानी दाखवलेली सोयाबीनप्रति पसंती कितपत खरी उतरते हे सर्वस्व सोयाबीन पिकाच्या उत्पादनावर अवलंबून असेल. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात लावलेल्या सोयाबीनच्या पिकातून दर्जेदार उत्पादनाची आशा आहे मात्र आता येणारा काळच रब्बी हंगामातील सोयाबीनचे भवितव्य ठरवेल.

English Summary: Soyabean Farming in Rabbi season
Published on: 28 January 2022, 05:22 IST