News

कृषी विभागाने राज्यातील खरीप हंगामात झालेल्या पेरणीविषयीचा अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार, खरिपातील पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. २०८ तालुक्यांमध्ये अपेक्षापेक्षा जास्त पाऊस झाला असून पिके वाढीच्या अवस्थेत आहेत.

Updated on 24 July, 2020 5:56 PM IST


कृषी विभागाने राज्यातील खरीप हंगामात झालेल्या पेरणीविषयीचा अहवाल सादर केला आहे. या अहवालानुसार, खरिपातील पेरणी अंतिम टप्प्यात आली आहे. २०८ तालुक्यांमध्ये अपेक्षापेक्षा जास्त पाऊस  झाला असून पिके वाढीच्या अवस्थेत आहेत.  खरिपाच्या १४१ लाख हेक्टर क्षेत्रापैकी २० जुलैअखेर १२४ लाख हेक्टर म्हणजेच ८७ टक्क्यांच्या आसपास पेरा झालेला आहे. गेल्या वर्षी  खरिपाच्या  याच तारखेपर्यंत पेरा ७० टक्के म्हणजे १०० लाख हेक्टर झाला होता. 

राज्यात भात, नागलीची पुर्नलागवडीची कामे वेगात सुरु आहेत. उर्वरित पेरण्य़ा प्रगतीपथावर आहेत. सोयाबीन, भुईमूग व मका फुलोऱ्यात आहेत. बागायती कापूस आता पाते धरण्याच्या , स्थितीत आहे. बहुतेक भागात निंदणी, कोळपणी  व इतर  अंतरमशागतीची कामे सुरू आहेत, असे अहवालात म्हटले आहे. राज्याचे मुख्य खरीप असलेल्या कपाशीचा पेरा ४० लाख हेक्टरवर झालेला आहे. गेल्या हंगामात हाच पेरा ३७ लाख हेक्टरच्या पुढे झाला होता. गेल्या हंगामापेक्षा सध्या कपाशीचा पेरा सद्य स्थितीत ९ टक्क्यांनी जादा दिसतो आहे.  तुरीचा पेरा १२.७४ लाख हेक्टरपैकी ११.५७ लाख हेक्टरवर झालेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पेरा १३० टक्के झालेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आत्तापर्यंत मुगाचा पेरा ५१ टक्के जादा, उडीदाचा पेरा ५४ टक्के जादा आहे.  भाताचा पेरणी करण्यासाठी राज्यात १५ लाख हेक्टर क्षेत्र उपलब्ध असते.  गेल्या हंगामात याच कालावधीत भात ४.४९ लाख हेक्टरवर लावला गेला होता. यंदा आतापर्यंत ५.४८ हेक्टरवर दिसते आहे. 

राज्याचे महत्त्वाचे खरीप पीक असलेल्या लागवड आता ८.१५ लाख हेक्टवपर पोहोचली आहे. गेल्या वर्षी या कालावधीत मका फक्त सहा लाख हेक्टरवर झाला होता.  गेल्या हंगामाच्या तुलनेत सध्या मक्याचा पेरा १३७ टक्क्यांनी जास्त असल्याचे  दिसते आहे.  दरम्यान सोयाबीन पेरणीत ३३ टक्के वाढ दुसऱ्या नंबरचे महत्त्वाचे पीक असलेल्या सोयाबीनचा पेरा ३९ लाख हेक्टरच्या पुढे गेला आहे. राज्यात सोयबीनचे क्षेत्र ३८ लाखाच्या आसपास आहे. गेल्या हंगामात या कालावधीत  सोयाबीनचा पेरा २९ लाख हेक्टरच्या आसपास होता. गेल्या वर्षाची तुलना  केल्यास आता सोयबीन पेरा ३३ टक्क्यांनी जास्त आहे.

दरम्यान केंद्र सरकारच्या अनुमानावरून देशात अजूनही काही ठिकाणी पेरणी चालू आहे. यावर्षी देशाच्या सर्वच भागात चांगला पाऊस असून त्यामुळे पिके शेवटपर्यंत टिकून राहण्याचे प्रमाण जास्त राहणार आहे. जर कोणतेही अस्मानी किंवा सुलतानी संकट आले नाही तर यंदा शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळेल अशी अशा आहे. खरिपाच्या १४१ लाख हेक्टर क्षेत्रापैकी २० जुलैअखेर १२४ लाख हेक्टर म्हणजेच ८७ टक्क्यांचा आसपास पेरा झालेला आहे. गेल्यावर्षी खरिपाचा याच तारखेपर्यंत पेरा ७० टक्के म्हणजे १०० लाख हेक्टर झाला होता.

English Summary: Sowing of soyabean, moong and urad are increased -Department of Agriculture
Published on: 24 July 2020, 05:55 IST