News

खरीप हंगामातील शेवटचे पीक म्हणून तूर पीक ओळखले जाते. अवकाळी पावसाने सोयाबीन, उडीद, मूग आणि कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते परंतु तूर या पिकाचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले नव्हते परंतु सातत्याने असणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे तूर पिकावर शेंगा पोखरणारी आळी, मर रोग आणि पानाफुलांच्या जाळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Updated on 31 December, 2021 1:31 PM IST

 खरीप हंगामातील शेवटचे पीक म्हणून तूर पीक  ओळखले जाते. अवकाळी पावसाने सोयाबीन, उडीद, मूग आणि कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले होते परंतु तूर या पिकाचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले नव्हते परंतु  सातत्याने असणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे तूर पिकावर शेंगा पोखरणारी आळी, मर रोग आणि पानाफुलांच्या जाळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

त्यामुळे तूर उत्पादनात 20 टक्के घट झाल्याचा अंदाज प्रक्रिया उद्योगाकडून व्यक्त करण्यात आला आहे. अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाचा कुठल्याही प्रकारचा परिणाम या पिकावर झालेला नव्हता. त्यामुळे तूर पीक चांगल्या येईल असा अंदाज व्यक्त केला जात होता परंतु या पिकाच्या अगदी अंतिम टप्प्यात ढगाळ वातावरणामुळे कीड व रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाल्याने तुरीच्या शेंगा पोसल्या गेल्या नाहीत.

जर आपण मराठवाड्याचा विचार केला तर एकूण लागवड क्षेत्रापैकी 28 टक्के क्षेत्रावरील पिके कीड आणि रोगांचे प्रादुर्भाव इत झाले आहे. पडणाऱ्या त्यामुळे फुलांची गळ मोठ्या प्रमाणात होऊन पाणथळ जमिनी, नदी नाल्या काठच्या जमिनीत पाणी साचून राहिल्याने मर रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात झाला होता.

 घटलेल्या उत्पादनाचा प्रक्रिया उद्योगावरही विपरीत परिणाम..

महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील तूर उत्पादक लागवड असलेल्या क्षेत्राचे सर्वेक्षण करण्यात आले असून या दोन्ही राज्यातील तुरीच्या उत्पादनात 20 टक्के घट झाली आहे. त्यामुळे कर्नाटकातील गुलबर्गा, तली कॅट आणि बिदर या भागात रुची उत्पादन मोठ्याप्रमाणात घेतल्या जात असताना यंदा मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्याचा थेट परिणाम हात तुर प्रक्रिया उद्योगांवर देखील होणार आहे.

( संदर्भ-Tv9 मराठी)

English Summary: Some reason behind decraese production of pigeon pie crop in maharashtra
Published on: 31 December 2021, 01:31 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)