News

मागील दोन महिन्यांपूर्वी कांद्याला चांगला भाव मिळत होता.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.कारण पडलेला जास्तीचा पाऊस आणि हवेतील आद्र्रता यामुळे चाळीस साठवलेला कांदा रडायला लागल्यामुळे तसेच खरीप लाल कांदा जमिनीतच खराब झाल्यामुळे पुरवठा आणि मागणी यामधील असंतुलनामुळे कांद्याच्या दरातसुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले होते.परंतु आता कांद्याच्या दरातसातत्याने घसरण होत असूनत्याला बरीचशी कारणे कारणीभूत आहेत.

Updated on 07 December, 2021 5:38 PM IST

 मागील दोन महिन्यांपूर्वी कांद्याला चांगला भाव मिळत होता.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.कारण पडलेला जास्तीचा पाऊस आणि हवेतील आद्र्रता यामुळे चाळीस साठवलेला कांदा रडायला लागल्यामुळे तसेच खरीप लाल कांदा जमिनीतच खराब झाल्यामुळे पुरवठा  आणि मागणी यामधील असंतुलनामुळे कांद्याच्या दरातसुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले होते.परंतु आता कांद्याच्या दरातसातत्याने घसरण होत असूनत्याला बरीचशी कारणे कारणीभूत आहेत.

 सध्याच्या काळात मध्य प्रदेश याच्यात कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने महाराष्ट्रातील कांद्याला दर कमी मिळत आहे. तसेच राजस्थान मधील कांदा देखील यायला सुरू झाल्यामुळे महाराष्ट्रातील कांद्याला दर कमी मिळतआहे.नाशिक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.त्यासोबतच कांदा रोपवाटिकेचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता कांदा दर वाढण्याची प्रतीक्षा आहे.कांद्याची वाढलेली आवक आणि मध्य प्रदेश राज्यातून होणाऱ्या वाहतुकीच्या आर्थिक बचतीमुळे परराज्यातील कांदा व्यापारी महाराष्ट्रातील कांद्याला आता दुय्यमस्थान देत असल्याने ही दरावर परिणाम होत आहे..

जर आपण सोमवारचा विचार केला तर नाशिक जिल्ह्यातील लासलगाव  आणि पिंपळगाव बसवंत या प्रमुख कांदा बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला 1500 ते 2200 रुपये भाव मिळाला दर मिळाला तरलाल कांद्याला 1500 ते 3500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत दर मिळत आहे. गेल्या वर्षी दक्षिण भारतामध्ये देखील या वर्षीजास्तीचापाऊस झाल्यामुळे तेथील कांदा पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्यामुळे येथील कांद्याची आवक कमी होती त्यामुळे दरात वाढ होण्याची शक्यता होती. परंतु या पार्श्वभूमीवरच राजस्थान आणि मध्य प्रदेशातील कांदा बाजारात दाखल झाल्याने महाराष्ट्रातील कांद्याला हवे तेवढे मागणी वाढली नाही.

जर आपण भौगोलिक दृष्ट्या विचार केला तर बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल या राज्यांना मध्यप्रदेश हे जवळचे राज्य असल्याने वाहतुकीसाठीकमी अंतर पडते.त्यामुळे  व्यापाऱ्यांचा वाहतूक खर्चदेखील कमी झाल्यामुळे आर्थिक बचत होते.शिवाय मध्य प्रदेशातील व्यापारी महाराष्ट्रातील कांदा दरापेक्षा कमी दराने कांदा विक्री करत असल्याने दुसर्‍या राज्यातील व्यापारी मध्यप्रदेशातील कांद्याला पसंती देत आहेत.

English Summary: some important reason behind onion rate decrease in maharashtra
Published on: 07 December 2021, 05:38 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)