कृषी विभागाच्या विविध शासनाच्या योजना मंजूर करत त्याच्या निविदा काढून लाभार्थी आदिवासी शेतकऱ्यांच्या स्टॅम्प वर सह्या घेऊन बनावट कागदपत्र बनवत शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर तब्बल 50 कोटी 72 लाख 72 हजारांचा अपहार झाल्याचा गुन्हा न्यायालयाच्या आदेशान्वये पेठ पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
यासंबंधी ची तक्रार तक्रारदाराने जिल्हा न्यायालयात दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशान्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्हा दाखल झालेल्या मध्ये आठ कृषी सहाय्यक, चार कृषी पर्यवेक्षक तसेच तीन ते चार कृषी मंडळ अधिकारी यांचा समावेश आहे.याबाबतची तक्रार योगेंद्र उर्फ योगेश सुरेश सापटे (हेदपाडा, ( एकदरा ), ता. पेठ जिल्हा नाशिक ) यांनी केली होती.
काय आहे नेमके प्रकरण?
महाराष्ट्र शासनाने आदिवासी उपयोजनेअंतर्गत मृद संधारणाच्या नाला बंडिंग,दगडी बांध,ढोळीचे बांध,सलग समतल चर, खोल सलग समतल चर, मातीचे बांध नूतनीकरण व जुनी भातशेती दुरुस्तीची 2011 ते 2017 दरम्यान पेठ तालुक्यात गतिमान मजगी दगडी बांध आणि पाणलोट मजगी दगडी बांध योजनेअंतर्गत कामासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती.
या कामासाठी शासनाने निविदा काढून प्रस्तावित कामे यंत्राच्या साहाय्याने तसेच मजुरांमार्फत करणे अपेक्षित होते.तसेच यामध्ये काही शेतकऱ्यांची जमीन सपाटीकरण याचाही समावेश होता.परंतु या बाबतीत ही सगळी कामे झालीच नाहीत बिलेमात्र निघाली आहेत.पाच वर्षे काम केल्याचे दाखवले ची तक्रार करण्यात आली आहे तसेच 2011 ते 2017 या कालावधीमध्ये मजूर व ट्रॅक्टर ग्रुप धारक या सर्वांना मिळून वीस हजार रुपये दिले जात. पण प्रत्यक्षात एक लाख 60 हजार रुपये मिळणे आवश्यक असताना त्यांच्या नावावरील पैसे संशयितांनी परस्पर काढले. पाणलोट मजगीदगडी बांधहीदुसरी योजना समांतर राबवली असे दाखवून त्यांची कामे ट्रॅक्टर नोंदणी धारक वमजुरांकरवी करून घेत परस्पर मजुरांच्या कोऱ्या चेकवर सह्या घेत मजुरांच्या नावे परस्पर पैसे काढले गेल.
यामध्ये पाणलोट योजनेच्या कामांमध्ये स्टॅम्प पेपर व पावतीच्या आधार घेऊन संशयितांनी पेठतालुक्यातील 10 गावात तीन कोटी 14 लाख 4504 कामांना मंजुरी देऊन पेठ तालुक्यात 50 कोटी 72 लाख 72 हजार 64 रुपयांची कामे पाच वर्षे ट्रॅक्टर धारक व गावातील 35 मजुरांनी मिळून केल्याचे दाखवले.त्यातील 147 शेतकऱ्यांच्या गटात जमीन सपाटीकरण यासाठी चार ट्रॅक्टर वापरले गेले. 35 मजुरांनी 610 दगडी बांधकाम केले. अशाप्रकारे पाच वर्ष काम केल्याचे दाखल्याची तक्रार आहे प्रत्यक्षात अशी कामे झालेलीच नाही बिले मात्र निघाली आहेत.(संदर्भ-वेबदुनिया)
Published on: 08 January 2022, 02:58 IST