News

राज्यातील शेतकऱ्यांना गतवर्षी अनेक संकटांना सामोरे जावे लागले आहे. सध्या खर्च आणि खतांची टंचाईचा (Fertilizer scarcity) यांचा सामना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे. यंदाच्या हंगामात खताची चिंता वाढणार आहे.आता यावर एक उपाय आहे.

Updated on 07 May, 2022 4:56 PM IST

राज्यातील शेतकऱ्यांना गतवर्षी अनेक संकटांना सामोरे जावे लागले आहे. सध्या खर्च आणि खतांची टंचाईचा (Fertilizer scarcity) यांचा सामना शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे. यंदाच्या हंगामात खताची चिंता वाढणार आहे.आता यावर एक उपाय आहे. कृषी विभागाने (Department of Agriculture) आता द्रवरुपी नॅनो युरिया (Nano urea) हाच यावरचा सर्वोत्तम पर्याय असल्याचे सांगितले आहे.

यंदा कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे खतांची टंचाई जाणवणार आहे. त्यामुळे आता हंगाम सुरु होण्यापुर्वीच कृषी विभागाकडून विविध पर्याय उपलब्ध करुन दिले जात आहेत. खत टंचाईवर पर्याय म्हणून यंदा नॅनो युरिया शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरणार आहे. पारंपरिक युरिया 100 किलो वापरला तर 35 किलो पिकांना लागू होतो. द्रवरूप नॅनो युरिया खत अर्धा लिटर वापरले तर 90 टक्के पिकांना लागू होते.

कपाशीची हंगामपुर्व लागवड रोखणार; कृषी विभागाचा मोठा निर्णय

नॅनो युरिया बेस्ट

रासायनिक खणतांचा तुटवडा जाणवणार आहे. डीएपी खताचा तुटवडा भासणार आहे. त्यामुळे आता 500 मिली इफ्को नॅनो युरियाची बाटली ही 45 किलो युरिया खतापेक्षा अधिक कार्यक्षम आहे. शिवाय युरियाच्या गोणीपेक्षा याचे दरही 10 टक्क्यांनी कमी आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होणार असून उत्पादनात वाढ होणार आहे.

फक्त उत्पादनासाठी नाही तर खर्चाच्या अनुशंगानेही हा युरिया चांगला ठरणार आहे. याचा कमी आकार आणि मोठी क्षमता असा हा नॅनो युरिया आहे. या युरिया रोपांच्या पोषणासाठी प्रभावी आणि परिणामकारक राहणार आहे. यामुळे उत्पादनात तर वाढ होईलच त्याचबरोबर पोषण तत्वांच्या गुणवत्तेमध्येही वाढ होणार आहे.

PM Kisan Samman Nidhi: यादीमध्ये तुमचे नाव असल्यास तुम्हाला मिळणार दरमहा पेन्शन; जाणून घ्या नियम आणि अटी

English Summary: Solutions to fertilizer scarcity; Read once
Published on: 07 May 2022, 04:50 IST