News

ज्या शेतकऱ्यांनी अगोदर सोलार वॉटर पंपिंग सिस्टम साठी अर्ज केले आहेत. अशा शेतकऱ्यांना हरियाणा सरकार नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा विभागाद्वारे तीन एचपी ते 10 एचपी च्या सौरऊर्जा पंपांसाठी 75 टक्के सबसिडी देण्याचा निर्णय हरयाणा सरकारने घेतला आहे. माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार ए ए डी सी जग निवास यांनी सांगितले की नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा विभाग द्वारे तीन एचपी, पाच एचपी,7.5 एचपी व 10 एचपी च्या सौर ऊर्जा पंपासाठी 75% सबसिडी दिली जाणार आहे.

Updated on 16 June, 2021 2:37 PM IST

 परंतु हे सौर ऊर्जा पंप फक्त अशा शेतकऱ्यांना दिले जाईल जे शेतकरी सुषमा सिंचन जसे ठिबक सिंचन, तुषार सिंचन योजनेद्वारे सिंचनाची व्यवस्था करतात आणि जमिनीमध्ये पाईपलाईन दाबून शेतीक्षेत्र सिंचित करतात.तसेच ज्या शेतकऱ्यांनी अगोदर सोलर वॉटर पंप मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज केले आहेत अशा शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे.

 सौर ऊर्जा पंपासाठी सबसिडी कशी मिळेल?

 ज्या शेतकऱ्यांना अगोदर सबसिडीच्या माध्यमातून सौर ऊर्जा पंप दिले गेले आहेत असे शेतकरी या योजने साठी पात्र राहणार नाहीत. तसं एका शेतकऱ्याला फक्त एकच सोलर पंप दिला जाईल. ज्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे अशा शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप कंपनी कडून वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर चार महिन्यांच्या आत सौर ऊर्जा पंप मिळतील. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी  शेतकऱ्याला 25% रक्कम जमा करावी लागते.

याशिवाय ए डी सी जग निवास यांनी  सांगितले की, ज्या शेतकऱ्यांनी  सोलर पंप अनुदानासाठी अर्ज केले आहेत आणि असे शेतकरी सोलार वॉटर पंपिंग सिस्टीम बसवू इच्छितात असे शेतकरी त्यांच्या लाभार्थ हिश्यातील डिमांड ड्राफ्ट ए डी सी कम सिपीओ आयडी झज्जर च्या नावाने बनवून अतिरिक्त उपायुक्त कार्यालय मध्ये जमा करू शकतात. कारण 24 जून नंतर शेतकऱ्यांकडून जमा केलेला कोणताही डिमांड ड्राफ्ट स्वीकारला  जाणार नाही.

English Summary: solar krushi pump
Published on: 16 June 2021, 02:37 IST