News

बऱ्याचदा शेतीमाल हा भावा अभावी वाया जातो. कधीकधी कवडीमोल दर मिळाल्याने शेतकरी शेतीमाल रस्त्यावर फेकून देतात.

Updated on 01 March, 2022 9:47 AM IST

बऱ्याचदा शेतीमाल हा भावा अभावी वाया जातो. कधीकधी कवडीमोल दर मिळाल्याने शेतकरी शेतीमाल रस्त्यावर फेकून देतात.

अशा परिस्थितीमध्ये अशा शेतमालावर काहीतरी प्रक्रिया करता यावी व त्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिलांना रोजगार मिळावा हा उदात्त हेतूने सौर वाळवण यंत्र व त्यासोबत भाजीपाल्याचे छोटे तुकडे करण्यासाठी लागणारे जे यंत्र आहेत ते घेण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडे औरंगाबाद जिल्ह्यातील 241 महिलांनी अर्ज केले होते या महिलांना महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून एक कोटी  92 लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे. यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील वाया जाणाऱ्या शेतमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाला एक नवीन गती मिळण्याची शक्यता आहे.

हा उपक्रम सायन्स फोर सोसायटी या कंपनीमार्फत ग्रामीणभागातील महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने राबविण्यात येत आहे.यामध्ये सायन्स फॉर सोसायटी ही कंपनी कोणता मला वाळवून द्यायचा हे सांगणारआहेवत्यासाठी लागणारा कच्चामाल देखील पुरवणार आहे. या भाज्यांचे छोटे-छोटे तुकडे करून सौर वाळवणी यंत्राच्या आधारे या भाज्या वाळवून देण्याचा व्यवसाय या महिला करणार आहेत.कारणवाळवलेले पदार्थ वाळलेल्या पदार्थांचे टिकवणक्षमता वाढते हेच तंत्रज्ञान वापरून या महिला हा व्यवसाय करत आहेत व त्या माध्यमातून उत्पन्न देखील त्या महिलांना मिळू लागले आहे. 

या कंपनीसोबत 241 महिला जोडल्या गेल्या असून त्यांना एक कोटी 92 लाख रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. यामध्ये तीन यंत्राची आवश्यकता असते. म्हणजेच भाज्यांचे तुकडे करणे, कच्चामाल स्वच्छ करणे  व तो वाळवणे यासाठी या यंत्राची आवश्यकता असते. या तीन यंत्रांसाठी प्रति महिला 90 हजार रुपयांचे कर्ज देण्यात आले आहे. या उपक्रमामुळे महिलांच्या आयुष्यात खरोखरच बदल होणार असून महिलांच्या हाताला काम मिळाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला एक नवा आकार मिळेल अशी आशा आहे.

English Summary: solar dryer machine give financial support to women in auaragabaad district
Published on: 01 March 2022, 09:47 IST