शेतकऱ्यांनी पिकविलेल्या शेतमालाला आधारभूत किंमत मिळावी तसेच शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळावा यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून विशेष सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यात आली असून त्याला भारत सरकारकडून पेटंट देखील प्राप्त झाले आहे.
अँड इंटेलिजंट सिस्टीम अंड ए मेथड फोर सिस्टिमॅटिक डिस्ट्रीब्यूशन ऑफ एग्रीकल्चर गुड्स या सॉफ्टवेअरचे नाव असून त्याला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून स्वामित्व हक्क मिळाले आहेत. यासंबंधीचे पत्र कुलगुरू डॉ. फडणवीस आणि अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश व्हनकडे यांना प्राप्त झाले आहे.शेतीमालाच्या तसेच विविध शेती वस्तूंच्या किंमत ठरवण्यात संबंधी आणि वितरण या संबंधी हे सॉफ्टवेअर उपयोगी ठरणार आहे. कोणत्या वेळी कोणते पिक घ्यावे तसेच विविध शेतीमालाला कोणत्या कालावधीमध्ये भाव प्राप्त होतो.
त्यासोबतच कोणत्या भागामध्ये त्या पिकाला दर मिळतो हे विद्यापीठाकडून तयार करण्यात आलेली सोफ्टवेअर मार्गदर्शन करू शकते.
सॉफ्टवेअरच्या मदतीने विभागानुसार बाजार मूल्य आणि माहिती शेतकऱ्यांना मिळण्यास मदत होणार आहे. तसेच या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून जिल्हानिहाय विक्री व वितरण व्यवस्था देखील सॉफ्टवेअरच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने करता येऊ शकते.
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळावा तसेच त्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी या विशेष सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचा शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होईल असा विश्वास कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी व्यक्त केला. (स्त्रोत-लोकसत्ता)
Published on: 04 January 2022, 04:50 IST