देशात लासलगाव बाजार समिती आतापर्यंत कांद्यासाठी सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जात होती. नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार पेठ देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. मात्र सोलापूर बाजार समितीने आपल्या चोख व्यवहाराच्या जोरावर मागील अकरा दिवसापासून शेतकऱ्यांची पहिली पसंती ठरली आहे. सोलापूर बाजार समितीमध्ये गेल्या काही दिवसापासून कांद्याची बंपर आवक होत आहे तसेच बाजार समितीमध्ये कांद्याला इतर बाजार समिती पेक्षा समाधानकारक बाजार भाव मिळत असल्याचे चित्र नजरेस पडत आहे.
सोलापूर बाजार समितीत होत असलेल्या उच्चांकी आवकेमुळे, उच्चांकी बाजार भावामुळे आणि उच्चांकी उलाढालीमुळे अवघ्या काही दिवसातच सोलापूर बाजार समिती कांद्यासाठी देशातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून नावारूपाला आल्याचे नजरेस पडत आहे. यामुळे महाराष्ट्राच्या शिरेपेचात अजून एक नवीन विक्रमाचा तुरा रोवला गेला असल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या अकरा दिवसात सोलापूर बाजार समितीने भारतातील सर्व नागरिकांनी बाजारपेठांना मागे टाकले आहे. सोलापूर बाजार समितीने आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ लासलगाव, मुंबई तसेच बेंगलोर सारख्या बाजारपेठांना देखील ओव्हरटेक केले आहे. गेल्या पंधरा दिवसात सोलापूर बाजार समितीच्या आवारात सुमारे सात लाख क्विंटल कांद्याची आवक झाली असल्याचे सूत्रांनी नमूद केले आहे. विशेष म्हणजे सोलापूर बाजार समितीत राज्यातून तसेच परराज्यातून देखील कांद्याची आवक येत असल्याचे समजत आहे. गेल्या पंधरा दिवसात सोलापूर बाजार समिती मध्ये चक्क 110 कोटी रुपयांची उलाढाल झाली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
तसं बघायला गेलं तर कांद्याची सर्वात जास्त उलाढाल करण्याच्या बाजारपेठांच्या यादीत मुंबई नाशिक पुणे या बाजारपेठानंतर सोलापूर बाजार समितीचा नंबर लागत असतो मात्र गेल्या काही दिवसात सोलापूर बाजार समितीने या तिन्ही बाजारपेठांना मागे टाकत शीर्ष स्थान पटकावले आहे. देशातील अग्रगण्य कांदा बाजारपेठ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर चित्र उभे राहत ते लासलगाव बाजार समितीच! मात्र गेल्या काही दिवसात आपल्या पारदर्शक व्यवहार याच्या जोरावर शेतकऱ्यांची पहिली पसंत ठरलेली सोलापूर बाजार समितीने आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठला देखील धोबीपछाड देत प्रथम क्रमांक पटकावल्याचे नजरेस पडत आहे. सध्या सोलापूर बाजार समिती मध्ये देशांतर्गत विविध राज्यातून मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असते.
बाजार समितीने कांद्याचे व्यवहारावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी बाजार समितीत अनेक उपाययोजना देखील केल्याचे बाजार समितीतील सूत्रांनी सांगितले यात प्रामुख्याने सीसीटीव्ही चा समावेश आहे. बाजार समितीच्या आवारात उठलास गैरव्यवहार होऊ नये म्हणून बाजार समिती प्रशासनाने बाजार समितीच्या आवारात जवळपास 100 सीसीटीव्ही लावल्याचे सांगितले जात आहे. याव्यतिरिक्त बाजारपेठेत 100 कर्मचारी काम करत आहेत तसेच 100 सुरक्षारक्षक देखील बाजार समिती आवारात रक्षण करण्यासाठी तैनात करण्यात आले आहेत.
Published on: 26 January 2022, 11:28 IST