News

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे की सोलापूर जिल्हा परिषदेचा कृषी विभाग मार्फत शेतकऱ्यांना अर्ध्या किमतीत कडबा कुट्टी यंत्र,पेरणी यंत्र, फवारणी पंप तसेच डिझेल इंजिन आणि ताडपत्री वाटप करण्यासाठी मंगळवारी झालेल्या कृती समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली.

Updated on 14 January, 2022 10:23 AM IST

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे की सोलापूर जिल्हा परिषदेचा कृषी विभाग मार्फत शेतकऱ्यांना अर्ध्या किमतीत कडबा कुट्टी यंत्र,पेरणी यंत्र, फवारणी पंप तसेच डिझेल इंजिन आणि ताडपत्री वाटप करण्यासाठी मंगळवारी झालेल्या कृती समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली.

ही अवजारे शेतकऱ्यांना जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून वैयक्तिक लाभ आवरून अर्ध्या किमतीत वाटप करण्यासाठी तीन कोटी 19 लाख 42 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेतून विविध शेती उपयोगी साहित्य वाटपास कृषी सभापती अनिल मोटे यांनी मंजुरी दिली.

 मागील बऱ्याच महिन्यांपासून शेतकरी या योजनेचे वाट पाहत होते परंतु कोरोनामहामारी मुळे शासनाकडूनसेसफंडाला 40% कात्री लावण्यात आल्यामुळे योजना राबवण्यात अडचणी आल्या होत्या. शासनाच्या ग्रामविकास विभागाने ही बंदी नुकतीच उठवली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता अनुदानावर शेती उपयोगी साहित्य खरेदी करणे सोपे होणार आहे.

 या योजनेसाठी असा करा अर्ज

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या गटातील सदस्यांच्या शिफारस पत्रासह सातबारा उतारा, बँक पासबुक झेरॉक्स,आधार कार्ड सोबत जोडून तालुका पंचायत समिती येथील कृषी विभागाकडे अर्ज करायचा आहे.
  • त्यामधून निवड झाल्यानंतर तुझ्यासाठी त्यासाठी अर्ज केला आहे ते साहित्य दुकानातून शेतकऱ्यांना स्वतः खरेदी करावी लागेल.
  • त्यानंतर या घेतलेल्या साहित्याची बिल पावती दाखवल्यानंतर संबंधित अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.

 या शेती उपयोगी साहित्य वर अनुदान उपलब्

  • ट्रॅक्टर अवजारे, रोटावेटर – 25000(85)
  • बॅटरी स्प्रे पंप- 2250 (155)
  • पलटी नांगर,  पेरणी यंत्र व कल्टीवेटर- 14000 (108)
  • सिंचन साहित्य- डिझेल इंजन, पाच व साडेसात एचपी इलेक्ट्रिक पंप,तुषार सिंचन- साडे अकरा हजार (869)
  • सुधारित अवजारे, कडबा कुट्टी यंत्र – 12000(1208)
  • ताडपत्री- 2000 (250)
English Summary: solapur agriculture depatment give sprey pump and some agri machinary with subsidy
Published on: 14 January 2022, 10:23 IST