भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यावरील कथित भ्रष्टाचारासंदर्भात काल वरवंड येथे सभा झाली. या सभेकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. या सभेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर, दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांच्यासह शिवसेनेचे इतरही नेते उपस्थित होते.
यावेळी भाजपचे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे म्हणाले की, महाराष्ट्र दिनादिवशी मी दौंड तालुक्यातील पाटस येथील मधुकाका शितोळे यांच्या पुतळ्यासमोर बसणार आहे. मी केलेले साखर कारखान्याच्या भ्रष्टाचाराचे आरोप खोटे असल्याचे विद्यमान आमदारांनी सिद्ध करून दाखवावे.
मी त्यांच्या घरी वर्षभर धुणीभांडी करीन असे आव्हान भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव ताकवणे यांनी दौंड चे भाजपचे आमदार राहुल कुल यांना दिले. यामुळे यावर राहुल कुल काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ताकवणे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी 36 कोटी रुपये दिले तरी कारखाना चालू झाला नाही.
बंपर कमाई! याठिकाणी शेतकरी एका खास पद्धतीने भेंडी पिकवतात, दर 100 रुपये किलो, जाणून घ्या..
असे असताना मात्र कर्नाटकच्या माणसाला कारखाना चालवायला दिल्यानंतर तोच कारखाना, तीच मशिनरी, तेच कामगार, तोच परिसर, तोच ऊस, मग कारखाना कसा चालू झाला? असा प्रश्न उपस्थित केला.
खाद्य तेलाचे दर वाढणार की कमी होणार, जाणून घ्या..
कारखाना जर चालूच होता तर मग बंद का ठेवला होता? सर्वसाधारण सभा झाली, एक ते बारा विषय मंजूर आणि आता ऐन वेळच्या विषयावर बोला असं म्हणत कोणाला बोलू न देता वर्षानुवर्ष अशाप्रकारे काम करता. असेही ते म्हणाले. यामुळे वातावरण तापले आहे.
मोदींचा 2 हजाराचा 14 वा हप्ता मे महिन्यात होणार जमा, शेतकऱ्यांनो केवायसी करा...
आता शेतीला दिवसा वीज! मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचे लोकार्पण..
दुःखद! वीज कोसळून अख्ख शेतकरी कुटुंब ठार
Published on: 27 April 2023, 10:30 IST